माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी स्वर्गीय सागर गोविंद गायकवाड यांच्या परिवारांची घेतली सांत्वनपर भेट.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस शहरातील स्वर्गीय सागर गोविंद गायकवाड यांचे गेल्या आठवड्यात दुःखद निधन झालेले होते. गायकवाड परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्याकरता माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यावेळेस भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर उपस्थित होते. यावेळी गायकवाड परिवारातील गोविंद गायकवाड, कांता गायकवाड, संजय गायकवाड, सतिश गायकवाड, मनोज गायकवाड, नितीन गायकवाड आदि परिवारातील सदस्य उपस्थित होते.

गेल्या आठवड्यामध्ये स्वर्गीय सागर गायकवाड यांचे दुःखद निधन झाले होते. मुंबई येथे अधिवेशन सुरू असल्याने माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते मुंबई येथे होते. शनिवार रविवार सुट्टीचा दिवस आणि आज आमदार राम सातपुते यांचा वाढदिवस असल्याने माळशिरस तालुक्यात आलेले होते. आ. राम सातपुते स्वतःच्या वाढदिवसाच्या आनंदात न रमता जनतेच्या सुखदुःखात सहभागी झालेले आहेत. वाढदिवसाचा हारतुरा, सत्कार न घेता पहिल्यांदा गायकवाड परिवारांचे सांत्वन करण्याकरता माळशिरस येथील निवासस्थानी गेले होते. त्यांच्या समवेत राहुल चंदेल व विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअवकाळी पावसाने माळशिरस तालुक्यात द्राक्षबागांचे अतोनात नुकसान !!.
Next articleवेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या 13 जागांसाठी 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here