माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांचा जनहितार्थ दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला.

आमदार व सर्वसामान्य जनता थेट संपर्कामुळे कार्यातून राम सातपुते यांची लोकप्रियता वाढली.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांचा जनहितार्थ जनतेच्या छोट्या-मोठ्या कामांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा दोन वर्षांचा यशस्वी कार्यकाल पूर्ण झालेला आहे आमदार राम सातपुते व सर्व सामान्य जनता थेट संपर्कामुळे कार्यातून राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यामध्ये लोकप्रियता दोन वर्षांमध्ये अधिक वाढलेली आहे.
आमदार राम सातपुते सर्वसामान्य कुटुंबातील आई वडील ऊस तोड कामगार घरची परिस्थिती बेताची अठराविश्व दारिद्र्य अशा कठीण परिस्थितीत विद्यार्थिदशेपासून अंगामध्ये संघर्ष ,चळवळ, अडचणीत असणाऱ्याला मदत करणे असे गुण अंगामध्ये असल्याने विद्यार्थी दसेपासून राम सातपुते यांच्या अंगावर मधील गुणांना वाव देण्याकरता त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी दिलेली होती यशस्वीपणे जबाबदारी पार पाडलेली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व विशेष कार्य अधिकारी श्रीकांतजी भारतीय यांनी महाराष्ट्रामध्ये सीएम चषक स्पर्धा आयोजित केलेली होती माळशिरस तालुक्याची जबाबदारी राम सातपुते यांच्याकडे दिलेली होती सीएम चषक स्पर्धा यशस्वीपणे स्थानिक भाजपचे कार्यकर्ते यांच्या मदतीने पूर्ण केलेली होती. माळशिरस विधानसभा मतदार संघावर मोहिते पाटील यांचे वर्चस्व होते मोहिते-पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे अकाली दुःखद निधन झालेले होते. देवेंद्रजी फडवणीस श्रीकांतजी भारतीय यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीची माळशिरस विधानसभेची उमेदवारी आमदार राम सातपुते यांना दिलेली होती. विधान सभेच्या निवडणुकीत देवेंद्रजी फडवणीस यांचे मार्गदर्शन, विजयसिंह मोहिते पाटील यांचे सहकार्य श्रीकांतजी भारतीय यांची चाणक्य नीति आणि माळशिरस विधानसभा मतदार संघातील भाजपचे निष्ठावान नेते व कार्यकर्ते यांच्या सहकार्याने राम सातपुते यांना माळशिरस विधानसभेचे आमदार होण्याचा बहुमान मिळालेला आहे.


माळशिरस तालुक्यामध्ये राम सातपुते यांनी निवडणुकीपूर्वी एक वर्ष अगोदर तालुक्यांमधील भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क सुसंवाद वाढवलेला होता तो आमदार झाल्यानंतर सुद्धा दोन वर्ष झाली तरी सुद्धा तसाच टिकून ठेवलेला आहे.
माळशिरस विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार होण्याचा बहुमान आमदार राम सातपुते यांना मिळालेला आहे.आमदार राम सातपुते यांनी मतदार संघामध्ये सर्वसामान्य जनता शेतकरी यांचे व्यक्तिगत सार्वजनिक कामे करण्यास सुरुवात केली सर्वसामान्य जनता आणि आमदार यांचा थेट सुसंवाद सुरु झाला फोनद्वारे जनतेच्या अडचणी आमदार सोडवितात सर्वसामान्य लोकांना आमदाराचा अभिमान वाटत आहे कोणत्याही कामासाठी फोन केल्यानंतर सकारात्मक उत्तर येऊन काम झाल्याचे समाधान जनतेच्या चेहऱ्यावर दिसत आहे. मतदार संघामध्ये कोरोना कालावधीमध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केलेल्या होत्या उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भेटी देऊन अडीअडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न केले होते तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना खते बी-बियाणे यांची अडचण येऊ दिली नाही लाईटचे डीपी जळाल्यानंतर एमएसीबीच्या अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून डीपी ची व्यवस्था केलेले आहे अनेक वेळा जनतेच्या साठी भर उन्हात रस्त्यावर आंदोलने केलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविले आहेत. माळशिरस तालुक्यामधील थेट जनतेच्या संपर्कामध्ये असल्यामुळे अनेक लोकांचे फोनवरून कामे झालेली असल्याने अनेक लोकांच्या मनामध्ये आमदार राम सातपुते यांच्याविषयी आत्मीयता वाढलेली आहे. दिवसेंदिवस राम सातपुते यांची जनतेच्या कार्यातून लोकप्रियता वाढत आहे समोरची व्यक्ती कोण आहे यापेक्षा त्याचे काम काय आहे याला महत्त्व दिलेले असल्याने आमदार राम सातपुते यांच्या दमदार व लोकप्रिय कार्याची ओळख सर्वसामान्य जनतेला झालेली आहे. आमदार राम सातपुते यांना जनतेने निवडून देऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत या दोन वर्षाच्या कार्यपूर्ती मध्ये सर्वसामान्य जनता व मतदार समाधानी असल्याचे चित्र मतदारसंघात पहावयास मिळत आहे.
आमदार राम सातपुते यांच्या दोन वर्षाच्या देदीप्यमान कामगिरीबद्दल बारामती झटका परिवार यांचेकडून त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीस व उर्वरित कालावधीसाठी हार्दिक शुभेच्छा हितचिंतक श्रीनिवास कदम पाटील संपादक बारामती झटका परिवार यांचेकडून मनस्वी खूप खूप शुभेच्छा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडी.आर.डी.ओ.चे शास्त्रज्ञ डॉ.विजय निंबाळकर यांचे स्वेरीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
Next articleसहकार महर्षी चारिटेबल हॉस्पिटल ट्रस्टच्या जागेचा ताबा घेण्याच्या हालचाली वाढल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here