महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या सहकार्याने चार कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी मिळाली
माळशिरस ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण विकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यातील मांडवे गावातील श्री क्षेत्र मारुती मंदिर (हनुमान) देवस्थान व एकशिव गावातील श्री क्षेत्र महादेव मंदिर देवस्थान या दोन्ही मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला चार कोटी रुपयांच्या मंजुरी मिळालेली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी दमदार कामगिरी केली असून मांडवे व एकशिव गावांना प्रत्येकी दोन दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा देऊन मांडवे गावचे ग्रामदैवत हनुमान मंदिर व एकशिव गावचे ग्रामदैवत महादेव मंदिर परिसर विकसित करण्याकरता प्रत्येकी दोन-दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. मंत्री, राज्यमंत्री व वरिष्ठ अधिकारी 14 लोकांची समिती असते. सर्व कागदपत्रांची तपासणी करून मंजुरी दिली जाते. ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांनी मंजुरीचे पत्र दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात विकासकामांचा धूमधडाका सुरू केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विकास वाटेवरून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची वाटचाल सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार असताना पुरंदावडे गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीसाठी दोन कोटी रुपये मंजूर केलेले होते. क वर्गातून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा देऊन मांडवे, एकशिव व पुरंदावडे गावातील भाविकांमधून लोकप्रिय आमदार यांच्याविषयी समाधानाची व आत्मियतेची भावना निर्माण झालेली आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng