माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी भांबुर्डी गावचे बिनविरोध सरपंच महादेव केसू वाघमोडे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत अण्णा वाघमोडे नारायण भाऊ वाघमोडे बापूराव खंडू वाघमोडे सोमनाथ सुतार गणेश वाघमोडे रोहन थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
भांबुर्डी गावच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ स्वातीताई दादासाहेब वाघमोडे यांनी राजीनामा दिलेला होता रिक्त झालेल्या सरपंचपदी सौ. लक्ष्मी महादेव वाघमोडे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली होती. आमदार राम सातपुते अधिवेशन व मंत्रालयीन शासकीय कामासाठी मुंबई येथे होते माळशिरस तालुक्यात आगमन झाल्यानंतर नूतन सरपंच लक्ष्मी वाघमोडे यांचे पतिराज महादेव केसू वाघमोडे यांचा सन्मान करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यामध्ये भांबुर्डी गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng