भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते यांच्या आरोग्यासाठी कण्हेरन्सिद्ध चरणी महारुद्राभिषेक करण्यात आला होता.
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांना करोनाची लागण झाल्याने त्यांना उत्तम आरोग्य लाभावे व या आजारातून बरे होण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर व कण्हेर ग्रामस्थ यांनी कण्हेरसिद्ध चरणी महारुद्राभिषेक होम हवन व महाआरती चे आयोजन करण्यात आले होते आमदार राम सातपुते यांनी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर व ग्रामस्थ यांच्या भावनेचा आधार केलेला आहे. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा जिव्हाळा व प्रेमाचे, मैत्रीचे नाते श्रेष्ठ ठरत असते असे आमदार राम सातपुते यांचे निकटवर्तीय यांनी आमदार राम सातपुते यांची जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर त्यांच्याविषयी भावना व्यक्त केलेली सांगितली आहे.

देशामध्ये पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत त्यामध्ये गोवा राज्य सुद्धा आहे गोवा राज्याचे प्रचार प्रमुख पदी आमदार राम सातपुते यांच्याकडे जबाबदारी असल्याने कोरोना मुक्त झाल्यानंतर गोवा राज्याच्या दौऱ्यावर आहेत माळशिरस विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर कण्हेर गावचे ग्रामदैवत कण्हेरसिद्ध मंदिरामध्ये येऊन दर्शन घेणार आहेत.
बाळासाहेब सरगर यांनी विधिवत महारुद्र अभिषेक केलेला होता यावेळी कन्हेरचे सरपंच पोपट माने, माजी सरपंच धनाजी माने, युवा नेते धर्मराज माने ,संभाजी माने, गणेश माने ,ग्रामपंचायत सदस्य दत्ता माने ,कांता रुपनवर, दादा माने, सदाशिव देवकाते, रामभाऊ बुरुंगले, महादेव वाघमोडे, तानाजी पिंजारी, औदुंबर राऊत, सुखदेव राऊत आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते यांचेही आभार मानले जाणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng