माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची वेळापूरतील तुळशी चहास सदिच्छा भेट.

तुळशी चहा हॉटेलमध्ये आमदार राम सातपुते व नेत्यांमध्ये रंगली राजकीय चाय पे चर्चा.

वेळापूर ( बारामती झटका )

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी वेळापूर ता. माळशिरस येथील तुळशी चहा या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. तुलसी चहाचे मालक मिलिंद नंदकुमार माने देशमुख यांनी आमदार राम सातपुते यांचे स्वागत केले. आमदार राम सातपुते यांचा सन्मान महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख यांनी केला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सतिशबाबा माने देशमुख, पंचायत समिती सदस्य ओंकार माने देशमुख, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शंकरराव काकुळे, माजी सरपंच माणिकराव चव्हाण,आंतुकाका माने देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दिपक राऊत, विकास माने, रणजित भाकरे, प्रलय खराडे, शरद चव्हाण, गोरख पिसे, चदु शिंदे, ज्ञानेश्वर बनकर, नवनाथ मोहिते आणि परिसरातील दुकानदार उपस्थित होते.

यावेळी वेळापूर परिसरातील विकास कामांविषयी माहिती व समस्या जाणून घेतल्या. शेरी नंबर 1 व शेरी नंबर 2 या रस्त्याची समस्या जितेंद्र माने देशमुख व मिलिंद माने देशमुख यांनी आमदारांना सांगितली. त्यावेळेस आमदार यांनी अमरसिंह माने देशमुख यांना पाठपुरावा सुरू असून दोन्ही रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागून काम सुरू होणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार राम सातपुते यांनी चहाचा आस्वाद घेऊन अनेक राजकीय विषयांवर नेत्यांसमवेत चर्चा केली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदिलासादायक बातमी : सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परतीच्या प्रवासावर.
Next articleमोहिते पाटील परिवारातील माजी सरपंच शिवतेजसिंह जनतेच्या मनातील विकासप्रिय सर्वमान्य युवा नेतृत्व.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here