गोवा विधानसभा निवडणुकीतील बॅकलॉग आठ दिवसात पूर्ण होणार, जनता दरबारास उदंड प्रतिसाद.
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचा मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू आहे गोवा विधानसभा निवडणुकीतील बॅक लॉक आठ दिवसात पूर्ण होणार जनतेचा जनता दरबार ब्रास उदंड प्रतिसाद मिळत आहे नागरिकांच्या अडचणी सुटत असल्याने समाधानाने नागरिक घरी परतत आहेत. सकाळी लवकर झंजावाती दौऱ्यास सुरुवात रात्री उशिरापर्यंत भेटीगाठी करून विश्रांती केली जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांनी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे गोवा राज्यातील म्हापसा विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिलेली होती त्यामुळे आमदारांचा गोवा दौरा होता गोवा राज्यातील विधानसभेचे मतदान झाल्यानंतर आमदार राम सातपुते यांनी मतदार संघात भेटीगाठी ला सुरुवात केलेली आहे. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी हरीभाऊ पालवे यांनी वेळोवेळी आमदार राम सातपुते यांच्याशी फोनवर संपर्क साधून जनतेच्या अडीअडचणी सोडविलेल्या आहेत. मात्र अनेक लोकांच्या घरांमधील सुख-दुःखाच्या भेटीला आमदारांना उपस्थित राहता आले नाही अनेक लोकांच्या लग्न समारंभात वधुवरांना शुभेच्या, वास्तुशांती, घरातील मृत्यू झालेल्या परिवारांचे सांत्वन भेट अशा अनेक प्रसंगांच्या भेटी देण्याचे आमदार राम सातपुते यांचे कार्य सुरू आहे. अनेक लोकांची इच्छा असते सुख दुःखाच्या प्रसंगी आमदार यांनी आपल्या घरी यावे हीच जनतेची इच्छा आमदार राम सातपुते पूर्ण करीत आहेत. अनेक लोकांची कामे मार्गी लावण्याचे काम सुरू आहे . कितीतरी लोक आमदार साहेब तुम्ही फोन केल्यामुळे अनेक दिवसाचे रखडलेले काम झाले म्हणून सांगायला आनंदाने येत आहेत.जनता दरबार असल्यासारखे लोक दररोज भेटीसाठी येत असतात सर्व नागरिकांना सहज आमदार उपलब्ध होत असल्यामुळे आलेल्या सर्व लोकांचे समाधान होत आहे. आमदार राम सातपुते यांची माळशिरस तालुक्यात दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत चाललेली आहे. कार्यकर्तृत्ववान आमदार म्हणून राम सातपुते यांच्याकडे जनता अपेक्षेने पाहत असते काम झाल्यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng