माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांचे चिरंजीव पैलवान वैभव लवटे पाटील यांच्या खांद्याची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
पुणे ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मेडद गावचे युवा नेते पैलवान वैभव बाळासाहेब लवटे पाटील यांच्या हाताच्या खांद्यावर झालेल्या दुखापतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर पैलवान वैभव यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता पुणे येथील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे आवर्जून भेट देली.
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य पश्चिम भागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब लवटे पाटील यांचे चिरंजीव वैभव लवटे पाटील यांच्या खांद्याला कुस्ती खेळत असताना दुखापत झालेली होती आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडलेली आहे. तब्येतीची चौकशी करण्याकरता खास आवर्जून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी दवाखान्यात भेट दिली त्यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य पश्चिम भागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब लवटे पाटील, मेडद गावचे माजी सरपंच सचिन उर्फ धुळा लवटे, उद्योजक दत्ताभाऊ झंजे, मेडद गावचे धुरंधर नेते माणिकराव सोनटक्के आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng