प्रभू श्रीरामांनी शिळेतून अहिल्याचा उद्धार केला तर, आमदार राम यांनी जर्जर हृदयाच्या आजारातून महिलेला दिले जीवदान.
लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे कार्य ना मतासाठी ना स्वार्थासाठी फक्त जनतेच्या हितासाठी…
माळशिरस ( बारामती झटका )
सदाशिवनगर ता. माळशिरस येथील मूळ रहिवासी असणारे अर्जुन ओव्हाळ उदरनिर्वाहाकरिता पुणे येथे हमालीचे काम करीत आहेत. त्यांच्या पत्नी ह्रदयाच्या आजाराने त्रस्त होत्या. ऑपरेशनसाठी मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाकडे पैसे नव्हते. त्यांना ऑपरेशन करणे शक्य नव्हते. अर्जुन ओव्हाळ यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा जनता दरबार माळशिरस येथील विश्रामगृहांमध्ये भरत असतो हे माहिती आहे. कोणतेही काम असो, एमएसईबी, कृषी विभाग, पाणी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद तालुक्यामधील अन्य कार्यालयातील कोणतीही कामे असो अथवा दवाखान्यातील मोठी ऑपरेशन असो, अशी कामे जनता दरबारामध्ये आमदार राम सातपुते करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देत असल्याचे अर्जुन ओव्हाळ यांना सोशल मीडियावरून पुणे येथे समजलेले होते. त्याप्रमाणे त्यांनी सदाशिवनगर येथील आमदार राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी हरिभाऊ पालवे यांच्याशी संपर्क करून जनता दरबाराची तारीख घेतली आणि त्यादिवशी अर्जुन ओव्हाळ यांची पहिली भेट झाली.
संपूर्ण हकीकत सांगितल्यानंतर आमदार राम सातपुते यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात पेशंटचे नाव सांगून हृदयाचे ऑपरेशन करण्यास सांगितले. सदरच्या ऑपरेशनचा साडेसहा लाख रुपये खर्च येत होता. आमदार राम सातपुते यांनी मोफत ऑपरेशन करून दिलेले आहे. फक्त फोन करून आमदार थांबले नाहीत, तर अर्जुन ओव्हाळ यांच्या पत्नीचे ऑपरेशन झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये भेट दिलेली आहे.
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबारामुळे हमाली करणाऱ्या अर्जुन ओव्हाळ यांच्या पत्नीचे मोफत ऑपरेशन होऊन कमाल झालेली आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने शिळेतून अहिल्या नामक महिलेचा उद्धार केलेला होता. त्याचाच प्रत्यय आमदार राम यांनी जर्जर रुदयाच्या आजारातून महिलेचे ऑपरेशन करून जीवदान दिले आहे. आमदार राम सातपुते यांच्या नावात नुसते राम नाही तर कामांमध्ये सुद्धा आहे हे रावण प्रवृत्तीच्या लोकांनी ध्यानात घ्यावे.
लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे कार्य ना मतासाठी, ना स्वार्थासाठी, फक्त जनतेच्या हितासाठी आहे. कारण उद्योग व्यवसायानिमित्त पुणे येथे हमालीचा व्यवसाय करणारे अर्जुन ओव्हाळ व त्यांची पत्नी मतदानालासुद्धा येऊ शकले नाहीत. तरीसुद्धा आमदार राम सातपुते यांनी साडेसहा लाख रुपयाचे मोफत ऑपरेशन करून माणुसकीचे दर्शन घडवून दिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng