सासर व माहेरचा राजकीय वसा नसताना माळशिरस नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2021 मध्ये प्रभाग क्र. 2 मधून सौ. ताई सचिन वावरे यांची बिनविरोध निवड.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक 2021 या निवडणुकीत प्रभाग क्र. दोनमधून सौ. ताई सचिन वावरे या नगरपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत बिनविरोध नगरसेविका झालेल्या आहेत. त्या माळशिरस शहरातील सर्जे परिवारातील कन्या आहेत तर, वावरे परिवार यांच्या सून आहेत. माळशिरस नगरपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान सासर व माहेर चा राजकीय वसा नसताना सौ. ताई सचिन वावरे यांना मिळालेला आहे.
माळशिरसमधील मुगुटराव किसन सर्जे व मंगल मुगुटराव सर्जे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये ताई यांचा जन्म झालेला आहे. त्यांना चैतन्य उमाकांत हे दोन बंधू व प्रियंका ही बहीण आहे. ताई यांचे शिक्षण माळशिरस प्रशाला माळशिरस येथे बारावीपर्यंत झालेले आहे. 1990 साली मुगुटराव सर्जे यांचे दुःखद निधन झालेले होते. श्रीमती मंगल सर्जे यांनी पितृत्व आणि मातृत्वाच्या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळलेल्या आहेत. बारावीनंतर 2004 साली माळशिरस शहरातील सचिन वावरे यांच्याशी त्यांचा विवाह झालेला होता. त्यांना समृद्धी व ओंकार ही दोन अपत्ये आहेत.

शिवाजीराव सोपान वावरे व शामल शिवाजीराव वावरे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये सचिन वावरे यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे महेश हे बंधू आहेत व संगीता, हर्षदा या बहिणी आहेत. शिवाजीराव वावरे यांचे 2014 साली दुःखद निधन झालेले होते. लहान वयामध्ये शिवाजीराव दादा यांच्या पश्चात सचिनआप्पांवर कुटुंबाची जबाबदारी आलेली होती. सचिनआप्पा यांनी उद्योग, व्यवसाय, शेती यामध्ये आपली प्रगती केली. आज यशस्वी युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लक्ष्मणासारखी साथ महेश बंधूची व स्वर्गीय शिवाजीराव दादा यांचा आशीर्वाद व आई श्यामल यांचे मार्गदर्शन यामुळे सचिनआप्पा यांनी शिवाजीराव दादा यांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवला. त्यांनी सामाजिक कार्यांमध्ये नेहमी सहभाग नोंदविला. अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत केली. सामंजस्याची भूमिका घेत समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केले. माळशिरस नगरपंचायत निवडणुकीच्या दोन वर्षापासून प्रभागांमध्ये जनतेच्या अडीअडचणी व वेळोवेळी मदत करण्याचे काम केलेले आहे. प्रभाग क्र. दोनमध्ये 639 पुरुष मतदार तर 563 स्त्री मतदार आहेत. तरीसुद्धा प्रभागातील एकाही मतदारांनी सचिन आप्पांच्या विरोधामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता. प्रभागाच्या बाहेरील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सौ. ताई सचिन वावरे यांच्या विरोधामधील विरोधी उमेदवाराने अर्ज काढल्याने माळशिरस नगरपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान सौ. ताई सचिन वावरे यांना मिळालेला आहे. उद्योजक सचिनआप्पा वावरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या माळशिरस शहरासह तालुक्यातील अनेक लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng