माळशिरस शहरात नगरपंचायतीकडून स्वच्छता व अतिक्रमण हटाव मोहीम संपन्न.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी माळशिरस नगरपंचायत सज्ज…

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत हद्दीत स्वच्छता व अतिक्रमण हटाव मोहीम नगरपंचायत अधिकारी माधव खांडेकर यांनी केलेली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशाने माळशिरस शहरातील अतिक्रमण 15 जूनपर्यंत काढण्याचे आवाहन करण्यात आलेले होते‌. रस्त्यावरील बॅनर, बोर्ड फलक अतिक्रमण काढून घ्यावीत, याबाबत माळशिरस नगरपंचायत व माळशिरस पोलीस स्टेशनच्या वतीने वारंवार जाहीर आवाहन करण्यात आले होते.

वारंवार सूचना करून देखील अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढली नसल्यामुळे माळशिरस नगरपंचायत व माळशिरस पोलीस स्टेशन संयुक्त विद्यमानाने अतिक्रमण काढून स्वच्छता मोहीम राबवली आहे.

माळशिरस नगरपंचायत हद्दीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा दुसरा मुक्काम असतो. मुक्कामाच्या ठिकाणी संपूर्ण परिसर स्वच्छ करून सुशोभित केलेला आहे. पालखी जाणाऱ्या रस्त्यावर अनेक स्थानिक नागरिकांचे अतिक्रमण होती. अतिक्रमण काढून सदर ठिकाणी कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. पालखी सोहळा स्वागतासाठी माळशिरस नगरपंचायत सज्ज झालेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleखासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या वारकऱ्यांचे सहर्ष स्वागत फलकाकडे लक्ष केंद्रित…
Next articleमाळशिरस शहरात लवकरच ग्राहकांच्या सेवेसाठी मे. यादव पेट्रोलियम होणार सुरू…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here