माळशिरस शहरात शिवजयंती उत्साहात साजरी…

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखदार पध्दतीने साजरा करण्यात आला. शिवछत्रपती युवकांनी रायगड ते माळशिरस शिवज्योत आणली होती. त्या शिवज्योतीचे स्वागत धुमधडाक्यात करण्यात आले. यावेळी आपला युवक शेतकरी फोरमचे मुख्य प्रवर्तक व अध्यक्ष ॲड. एम. एम. मगर साहेब यांनी शिवज्योतीचे हार घालुन स्वागत केले व शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

यावेळी अर्जुनसिंह मोहिते पाटील, विजय खराडे, नंदकुमार घाडगे, निलेश घाडगे, ॲड. जी. पी. कदम, माळशिरस नगरपंचायतचे नुतन उपनगराध्यक्ष शिवाजी देशमुख, आबासाहेब देशमुख, सागर चव्हाण, सुमित पवार, आप्पा सांळुखे, विजय लोंढे, महादेव पिसे, शंकर बिरलिंगे, तुकाराम कोळी, श्रीकांत मगर, सलिम पठाण वैगेरे शिवप्रेमी मंडळी उपस्थित होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे रांगोळीतुन काढलेल्या तैलचित्राने सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. तैलचित्र काढणारा कलाकार स्वप्निल पिसे यांचे सर्व शिवप्रेमींनी कौतुक केले. यावेळी शिवजयंती निमित्त ॲड. एम. एम. मगर यांनी त्या कलाकाराला ५०१ रुपये बक्षीस दिले. शिवजयंती निमित्त माळशिरस येथे दि. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे शिवप्रतिष्ठाचे अध्यक्ष निलेश घाडगे यांनी सांगितले. शेकडो शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांना आज अभिवादन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजि.प. सदस्या ज्योतीताई पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
Next articleकण्हेर गावचे माने-पाटील आणि तिरवंडी गावचे वाघमोडे-पाटील यांचा शाही शुभसोहळा संपन्न .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here