पुरस्कार मिळाल्याबद्दल दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर रंजनभाऊ गिरमे यांनी पत्रकार मिलिंद गिरमे यांचा सन्मान केला.

माळीनगर (बारामती झटका )
माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार व माळीनगर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद मधुकरराव गिरमे यांना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पातळीवरील पत्रकार संघटनेकडून या वर्षीचा “राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार” जाहीर करण्यात आला असल्याची माहिती या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांनी दिली.

मिलिंद गिरमे यांनी आपल्या गेली ३६ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून, लेखणीतून राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, शेती, कला, क्रीडा तसेच विविध सामाजिक विषयांवर प्रभावी असे लेखन केल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.अकोला जिल्ह्यातील अंत्री येथे दि. १५ व १६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात गिरमे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. देशातील विविध नामांकित पत्रकारांनी केलेल्या लेखणीचा आढावा घेऊन विविध क्षेत्रातील पत्रकारांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मिलिंद गिरमे यांना पत्रकारितेतील राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माळीनगर साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांनी गिरमे यांचा शाल व हार घालून सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. तसेच कारखान्याचे होलटाईम डायरेक्टर सतीश गिरमे, संचालक राहुल गिरमे, विशाल जाधव, शुगरकेन सोसायटीचे संचालक हेमंत गिरमे, अमोल ताम्हाणे, म. फुले पतसंस्थेचे संचालक अमोल गिरमे, मनीष रासकर, सारंग भोंगळे, माळीनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाळ लावंड, सचिव रितेश पांढरे, सदस्य प्रदीप बोरावके, गणेश करडे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng