माळीनगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रकाशराव निंबाळकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

माळीनगर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विराजसिंह निंबाळकर यांना पितृषोक.

माळीनगर ( बारामती झटका )

माळीनगर ग्रामपंचायतींचे माजी उपसरपंच प्रकाशराव पांडुरंग निंबाळकर यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवार दि. ३१/१२/२०२२ रोजी सकाळी ८ वाजून १४ मिनिटांनी अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी विवाहित असून माळीनगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विराजसिंह प्रकाशराव निंबाळकर यांचे ते वडील होते. तसेच सवतगावचे हॅट्रिक सरपंच, खरेदी विक्री संघाचे प्रभारी चेअरमन नितीनराजे निंबाळकर यांचे ते चुलते होते. त्यांना पका पाटील या टोपण नावाने ओळखले जायचे. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता.

पका पाटील यांच्या अंत्यविधीस सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे, नंदकुमार गिरमे, महादेव एकतपुरे, गिरीश एकतपुरे, राहुल गिरमे, राजेंद्र शिंदे, अरुण तोडकर, विकास कोळेकर, रावसो पराडे, केशवराव ताटे, शंकरराव माने देशमुख, अमर देशमुख, अनिल कोकाटे, अमर जगदाळे, माजी जि .प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्वसामान्य व गोरगरीब हजारो नागरिक उपस्थित होते. शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माळीनगर, सवतगाव, बिजवडी, तांबवे, गणेशगाव येथे बंद पाळण्यात आला होता. रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम सोमवारी दि. ०२/०१/२०२३ रोजी सकाळी ०७ वाजून ३० मिनिटांनी सवतगव्हाण येथे वैकुंठ स्मशानभूमी मध्ये होणार आहे. पका पाटील यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व निंबाळकर परिवाराला दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी भाजप नेते के. के. पाटील यांचा सन्मान केला
Next articleमुख्यमंत्र्यांनी मोळी टाकली, पण अजून उसाचे गाळप नाही !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here