माळीनगर(बारामती झटका )
येथील माळीनगर पत्रकार संघाचे नूतन अध्यक्षपदी प्रदीप बोरावके यांची तर सचिवपदी रितेश पांढरे यांची पुनःश्च निवड करण्यात आली.

माळीनगर पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची माळीनगर साखर कारखान्याचे अतिथी गृहात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे मार्गदर्शक मिलिंद गिरमे हे होते.संघाचे विद्यमान अध्यक्ष गोपाळ लावंड यांची मुदत संपल्याने त्यांच्या जागी नूतन अध्यक्ष म्हणून प्रदीप बोरावके यांची तर सचिवपदी रितेश पांढरे यांची पुनश्च सर्वानुमते पुढील दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आल्याचे बैठकीचे अध्यक्ष मिलिंद गिरमे यांनी यावेळी जाहीर केले. संघाचे मावळते अध्यक्ष गोपाळ लावंड यांनी नूतन अध्यक्ष प्रदीप बोरावके आणि सचिव रितेश पांढरे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.पत्रकार गणेश करडे, गोपाळ लावंड, रितेश पांढरे यांनी मनोगत व्यक्त केले.शेवटी प्रदीप बोरावके यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng