माळीनगर (बारामती झटका)
माळीनगर ता. माळशिरस येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी माळीनगर या साखर कारखान्याच्या नूतन चेअरमनपदी राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गोपाळराव गिरमे यांची आज निवड करण्यात आली. माळीनगर साखर कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाच्या सभेचे आज रविवार दि. १८ डिसेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे विद्यमान चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर नंदकुमार गिरमे हे होते. यावेळी कारखान्याच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच या सभेत कारखान्याचे नूतन चेअरमन म्हणून राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांची सर्व संचालकांनी पुढील दोन वर्षासाठी एकमताने निवड केली. यावेळी कारखान्याचे होलटाईम डायरेक्टर सतीश गिरमे, व्हा. चेअरमन परेश राऊत, संचालक अशोक गिरमे, राहुल गिरमे, गणेश इनामके, मोहन लांडे, विशाल जाधव, यश बोरावके, निळकंठ भोंगळे, निखिल कुदळे, इंडिपेंडन्स डायरेक्टर सतीश साबडे, सतेज पैठणकर आदी उपस्थित होते.

राजेंद्र गिरमे हे 33 वर्ष कारखान्याचे संचालक मंडळात असून त्यांनी व्हा. चेअरमन, होलटाईम डायरेक्टरपदी काम पाहिले आहे. तसेच त्यांनी गेली १५ वर्ष मॅनेजिंग डायरेक्टरपद भूषविले असून ते आता कारखान्याचे चेअरमन झाले आहेत. या निवडीमुळे सर्व क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
या निवडीनंतर साखर कारखान्याच्या वतीने सर्व संचालकांनी राजेंद्र गिरमे यांचा हार घालून सत्कार केला. तसेच शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हा. चेअरमन कपिल भोंगळे, एज्युकेशन सोसायटीचे संचालक अजय गिरमे, पृथ्वीराज भोंगळे, दिलीप इनामके, महात्मा फुले पतसंस्थेचे व्हा. चेअरमन महादेव एकतपुरे व संचालक मंडळ, माळीनगर ग्रामपंचायतचे सरपंच अभिमान जगताप व सदस्य, गहिनीनाथ अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन शिरिषभाई फडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रिंकू राऊत व व्यापारी, माळीनगर पत्रकार संघाचे संस्थापक मिलिंद गिरमे, सचिव रितेश पांढरे, सदस्य गोपाळ लावंड, गणेश करडे, माळीनगर मल्टिस्टेटचे पदाधिकारी, माळीनगर विकास मंडळाचे सदस्य तसेच गेटकेन ऊस उत्पादक बागायतदार, कारखान्याचे भागधारक, सभासद, शेतकरी, कामगार, ग्रामस्थ यांनी श्री. गिरमे यांचा शाल व हार घालून सत्कार केला. तसेच अनेकांनी चौकात फटाके वाजवून त्याचप्रमाणे फोनद्वारे, व्हाट्सएपच्या मेसेजद्वारे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng