माळेवाडी (बारामती झटका)
सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रामनागर ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. अजीत रेवंडे, सौ. मनीषा माने, सौ. आशा सावंत, सौ. सीमा बारबोले, सौ. सोनवणे मॅडम, सौ. वैद्य मॅडम तसेच माळेवाडी येथील राजेंद्र बनकर, उमेश फुले, कांबळे सर, धोत्रे सर या सर्व दात्यांनी माळेवाडी अकलूज येथील श्री सावता माळी विद्यालयातील गरजू १५ विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा मानस केला. त्यानुसार विद्यालयाचे श्री. संतोष बरबोले सर यांनी प्रयत्न करून आज दि. १ डिसेंबर रोजी २०२१ जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री सावता माळी विद्यालय, माळेवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना १५ गणवेशांचे वाटप करण्यात आले.
सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कुल कमिटीचे सभापती श्री. नामदेवराव गलांडे होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव गलांडे व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मिले सर यांचे हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मिले सर, भुसारे सर, पठाण सर, डामसे सर, गायकवाड सर, संतोष बारबोले सर आणि अशोक व्यवहारे यांनी प्रयत्न केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng