मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) भाग – १ श्री. सतीश कचरे, मंडळ कृषि अधिकारी

नातेपुते (बारामती झटका)

सन २०१० ते २०१८ या कालावधीत जागतिक बँक अर्थसहायित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांची उत्पादकता, नफाक्षमता व बाजारपेठ प्रवेश वाढविण्यात आली व यातून ४१२ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आली. ४.३ लाख स्वयंसहायत्ता गटाचे सबलीकरण, १८६६२ ग्रामसंघ, ७१८ प्रभाग संघ, १३००० सुक्ष्म उद्योग व ३६१ माविमा लोकसंचलीत साधना केंद्र स्थापन करण्यात आली आहे. या झालेल्या पायाभुत सुविधा यांना देशांतर्गत जागतिक बाजारपेठेतील संधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी अधिक नियोजन राज्यात जागतिक बँक अर्थसहाय्याने मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात आहे.

प्रकल्पांचे उदिष्ट – राज्यातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी आणि कृषि उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून स्पर्धात्मक व सर्वसमावेशक कृषि मुल्य साखळी विकसित करणे व यामध्ये तांत्रीक सहाय्य, पायाभुत सुविधा आणि जोखीम निवारण क्षमता करण्यासाठी गुंतवणूक केली जाईल. यामध्ये शेतकरी एकत्र येऊन स्थापना केलेल्या संघ / संस्थांना माध्यमातून काढणी पश्चात हाताळणी मुल्यवर्धन व प्राथमिक प्रक्रिया केलेला माल संघटीत खरेदीदार व प्रक्रिया उद्योग व निर्मातदारांना पुरवठा करण्याची व्यवस्था उभारण्यास भर देण्यात येईल. त्यासाठी शेतकरी संघ / संस्थांना आणि खाजगी उद्योग यांना एकत्रित प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील. यामध्ये खाजगी उद्योग, खरेदीदार गुणतवणुकीसाठी अर्थसहाय्य देय राहणार नाही. बाजारपेठेतील चढउतार आणि काढणी प्रश्चात जोखीम निवारणाची व्यवस्था उभी करण्याचाही प्रकल्पामध्ये समावेश राहील.

प्रकल्प कालावधी – सन २०२० – २१ ते २०२६-२७ -७ वर्षे. लाभार्थी – शेतकरी उत्पादक संस्था, प्रभाग संघ, माविमा लोकसंचलीत साधन केंद्र, प्राथमिक कृषि सहकारी संस्था, उत्पादक संघ, आत्मा नोंदणी गट याची पात्रता राहील. प्रकल्पातील बाबी – उत्पादक भागीदारी प्रकल्प, बाजार संपर्क वाढ, उपप्रकल्प, गोदाम आधारीत उप प्रकल्प यांचा समावेश असेल. पात्रता – अल्प अत्यल्प भुधारक शेतकरी ८०%, अनुसूचित जाती व जमाती – १३% महिला उत्पादक / शेतकरी ५०% सभासद सदस्य असणे आवश्यक आहे.

प्रकल्पांचे घटक – १ – कृषि व्यवसाय सुधारणांसाठी संस्थांत्मक व्यवस्थेचे बळकटीकरण, कृषि क्षेत्रातील सुधारणाच्या अंमलबजावणीसाठी संशोधन व तांत्रीक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. मनुष्यबळाचा क्षमता विकास व मुल्य साखळी व सभाग विकासासाठी संवाद मंच स्थापना करण्यात येणार आहे. २ – कृषि व्यवसाय विकास व बाजारपेठ प्रवेश नवउद्योजक प्रोत्साहन व तांत्रिक सहाय्याद्वारे उत्पादक व खरेदीदार एकत्रित आणणारे भागीदार प्रकल्प उभे करणे व बाजारपेठेला जोडणेचा आवश्यक ते उपक्रम राबविणे, शेतीमाल निर्यात चालना देणे व शेतकरी समुहाना सुलभ अर्थपुरवठा करणे. ३ जोखीम निवारण व्यवस्था उभी करणे – बाजारभाव उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभारणी करणे व बाजार भाव चढ उतार जोखीम करणेसाठी गोदाम उभारणी व शेतमाल तारण अर्थसहाय्य बळकटीकरण करणे हे प्रकल्पातील प्रमुख घटक आहेत. पुढील क्रमशः भाग – २ मध्ये कोण भाग घेऊ शकते, निवडीचा प्राधान्यक्रम स्मार्ट प्रकल्प अनुदान इत्यादी बाबीवर माहीती घेऊ या !!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकचरेवाडी ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ. उज्वलाताई हनुमंतराव सरगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Next articleमहाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्ह्याची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा माळशिरस येथे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here