टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे जावयाची सासू, सासरे, मेव्हणा व मामा यांच्या विरोधात फिर्याद दाखल.
टेंभुर्णी ( बारामती झटका )
मिटकलवाडी ता. माढा येथील दादासो सुरेश माने यांना टेंभुर्णी येथे पत्नी ऋतुजा तिच्या माहेरच्या घरी गेल्यानंतर कौटुंबिक वादातून ऋतुजाचे मामा सचिन हनुमंत कांबळे गट नंबर 2 ता. माळशिरस, सासू पार्वती विजय आदाटे, मेहुणा प्रणील विजय आदाटे, सासरे विजय बाबासो आदाटे, यांनी शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी व फळकटाने मारहाण केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 1960 कलम 326, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला आहे.
टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीमध्ये सुरेश दादासो माने वय 26 रा. मिटकलवाडी, ता. माढा यांनी असे नमूद करण्यात आले आहे कि, ते श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना येथे नोकरी करीत आहे. त्यांचा विवाह सन 2020 रोजी ऋतुजा विजय आदाटे यांच्याशी झालेला होता. लग्नानंतर तीन महिने व्यवस्थित गेल्यानंतर आईच्या सांगण्यावरून वारंवार भांडण करून टेंभुर्णी येथे माहेरी जात होती. दि. 8/9/2021 रोजी 11:30 वाजण्याची सुमारास सासरवाडीला गेलो होतो. तेव्हा सासू, सासरे, मेहुणा व पत्नी ऋतुजा तिचे मामा सचिन हनुमंत कांबळे तेथे होते. माझ्या बायकोला नांदायला चल येणार नसेल तर मला घटस्फोट दे, असे म्हटल्यावर सचिन हनुमंत कांबळे यांनी शिवीगाळ करून त्यांनी तेथे पडलेली लाकडी फळी हातात घेऊन माझ्या डाव्या कानावर मारून गंभीर जखमी केले. माझी सासू पार्वती विजय आदाटे यांनी तिच्या हातातील काठीने माझ्या पाठीवर मारहाण केली. मेव्हणा विजय आदाटे व विजय बाबासो आदाटे यांनी शिवीगाळ, दमदाटी केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे आलो. सरकारी दवाखान्यात गेलो असता डॉक्टरांनी कानाचे डॉक्टरांकडे जावा असे सांगितल्यानंतर माहेर हॉस्पिटल अकलूज येथे पाच दिवस उपचार घेऊन टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे घडलेल्या घटनेच्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, असे नमूद करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशन करीत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng