मित्र सहकार पॅनलची पुरंदावडे सोसायटीच्या निवडणुकीत प्रचारात आघाडी…

सभासद शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन होम टू होम प्रचार केल्याने सभासदांचा वाढता पाठिंबा मिळत आहे

पुरंदावडे ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात सुपरिचित व राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असणारी पुरंदावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सत्ताधारी गटाचे मित्र सहकार विकास पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात व उत्साही वातावरणात पार पडल्यानंतर मित्र सहकार पॅनल मधील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, आजी-माजी चेअरमन, संचालक व उमेदवार यांनी सभासदांच्या घरी जाऊन व सभासद शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नियोजनबद्ध होम टू होम प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. भविष्यातील सभासदांच्या हिताचे व संस्थेच्या फायद्याचे नियोजन सभासदांना पटवून सांगत असल्याने सभासद मतदारांचा मित्र सहकार पॅनलला वाढता पाठिंबा मिळत आहे.

मित्र सहकार पॅनलच्या प्रचाराच्या सुरुवातीस पुरंदावडे गावचे ग्रामदैवत महालक्ष्मी देवीस विद्यमान सरपंच देविदास ढोपे यांच्या शुभहस्ते अभिषेक करण्यात आला आणि प्रत्यक्ष सभासदांच्या भेटीगाठीला उमेदवारांसह पॅनलमधील सर्व ज्येष्ठ मंडळी नियोजनबद्ध प्रचार करीत आहेत.

त्यामध्ये काळजीवाहू चेअरमन रामचंद्र बाबा गोरे, व्हाईस चेअरमन सौ. आशा हनुमंत पालवे, मार्गदर्शक माजी सरपंच भगवान पिसे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम नाळे, माजी संचालक व पुरंदावडे गावचे माजी सरपंच विष्णू ओव्हाळ, ज्येष्ठ नेते तुळशीराम सुतार, रत्नत्रय उद्योग समूहाचे संस्थापक अनंतलाल दोशी, धर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन व माजी सरपंच प्रताप सालगुडे पाटील, माळशिरस तालुका रेशन दुकानदार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल अर्जुन, माजी चेअरमन पोपटराव गरगडे, जय मल्हार क्रांती संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष तुकाराम चव्हाण, तालुका उपाध्यक्ष सुदाम ढगे, युवा नेते शशिकांत सालगुडे पाटील, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन वीरकुमार दोशी, सचिव ज्ञानेश राऊत, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे माजी तालुकाध्यक्ष युवा नेते सोमनाथ पिसे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, उपसरपंच कुंडलिक पालवे, माजी उपसरपंच संतोष शिंदे, मेडद गावचे उपसरपंच शिवाजी लवटे, शेतकरी संघटनेचे दत्‍ता भोसले, नाना पिसे, राजाभाऊ अर्जुन, सोपान ढोपे, बाळासाहेब ओव्हाळ, ज्ञानदेव चव्हाण, गुलाब वाघ, गणेश ओवाळ, बापू घाडगे, पोपट पालवे, बाळासाहेब पिसे, सुनील सालगुडे, नामदेव बोडरे, अण्णा अर्जुन, हरी राऊत, तुकाराम ढगे, बाळू पांडुरंग सुळे, बबन सुळे, श्रीकृष्ण गोरे, सागर ओव्हाळ, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग नाळे, बाळासाहेब सुळे पाटील, शंकर पालवे, विशाल ओव्हाळ, हरी राऊत मास्तर, मेजर सावता गोरे आदी मंडळींनी प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे.

मित्र सहकार विकास पॅनलमध्ये सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात गरगडे अशोक तुकाराम, नाळे कुंडलिक रामहरी, सालगुडे बाळासाहेब दिनकर, शिंदे रामचंद्र शंकर, गोरे रामचंद्र बाबा, पिसे भगवान लक्ष्मण, शिंदे जनार्दन सुखदेव, बाळासो आत्माराम असे आठ सदस्य उभे आहेत. महिला प्रतिनिधी गटात बोराटे अंजना रघुनाथ, सौ. पालवे अशा हनुमंत अशा दोन महिला आहेत. इतर मागास वर्गीय गटात ढगे वसंत नारायण, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात अर्जुन दादासो काशीद, अनुसूचित जाती जमाती गटात वाल्मीक वसंत असे सर्व मिळून तेरा सदस्य उभे आहेत. सर्वांना कपबशी हे चिन्ह मिळालेले आहे. सर्वांनी मिळून कपबशी चिन्ह सभासदांच्या मनावर बिंबवले गेले आहे. मतदान दि 04/06/2022 रोजी सकाळी 08 ते दुपारी 04 वाजेपर्यंत होणार आहे. लगेच मतमोजणी होऊन निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराज्याच्या हक्काचे पैसे वेळेत का मिळत नाही, रविकांत वरपे यांचे ट्वीट
Next articleमांडवे गावात ह.भ.प. नामदेव तुकाराम महाराज साळुंके यांचे सुश्राव्य किर्तन होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here