मिळालेले मानधन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना दान करणार – शाहीर राजा कांबळे

अकलूज ( बारामती झटका )

दि. 25 एप्रिल रोजी शाहीर राजेंद्र कांबळे यांचे वडील सोपान कांबळे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. यावेळी राजेंद्र कांबळे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम अक्कलकोट येथे सुरू होता. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळली तरीही राजाभाऊ कांबळे यांनी कार्यक्रम सुरूच ठेवला.

थोर समाज सुधारक गाडगे बाबा यांनी समाज प्रबोधन चालू असताना स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळाली तरीही आपले समाजप्रबोधन चालूच ठेवले आणि उपस्थितांना म्हणाले, असे मेल्या कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी, त्या समाजसुधारकांचा वसा घेत आज दि. 26 एप्रिल रोजी 15 सेक्शन जांबुड या ठिकाणी राजेंद्र कांबळे यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी राजा कांबळे म्हणाले, माझे समाज प्रबोधन मेलेल्या माणसासाठी नसून जिवंत माणसाला परिवर्तन करण्यासाठी आहे. म्हणून अक्कलकोट 15 सेक्शन येथील मिळालेले मानधन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसाठी वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त दान करणार आहे, शाहीर राजेंद्र कांबळे खुडुसकर यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleफोंडशिरस विकाससेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमन पदी श्रीराम दाते तर व्हा. चेअरमनपदी मनोजकुमार गांधी यांची निवड.
Next articleकण्हेर विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत कण्हेरसिध्द शेतकरी विकास पॅनल व कण्हेरसिध्द परिवर्तन सहकार विकास पॅनल यांच्यात समोरासमोर लढत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here