मुंबई ते सेवाग्राम “जुनी पेंशन” या मागणीसाठी संघर्ष याञा – दिपक परचंडे

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्यामध्ये दि. 1 नोव्हेंबर 2005 पासून जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांची 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या राज्य सरकारी कर्मचारी यांची 1982 ची जुनी पेंशन योजना रद्द केली आहे. व यानंतर सेवेत रूजू असलेल्या कर्मचारी यांना DCPS व NPS या योजनांचा लाभ दिला जाईल असे आदेशीत केले आहे. सदरची योजना ही सर्व राज्य सरकारी कर्मचारी यांना अतिशय अन्यायकारक आहे, असे शिक्षक सहकार संघटनेचे पुणे विभागीय प्रमुख दिपक परचंडे यांनी आपले मत मांडले आहे.
आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 850 शिक्षक बांधव हे मयत झालेले आहेत. पण सदरच्या योजनेखाली शासनाने कोणताही लाभ मयत बांधवांच्या वारसांना दिलेला नाही. तेव्हा सदरच्या योजना ह्या कर्मचारी यांच्यासाठी अतिशय फसव्या असून राज्यातील धनदांडग्या कंपन्यांकडे या योजनांची मक्तेदारी असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व कर्मचारी यांना 1982 ची जुनी पेंशन लागू करण्यात यावी, यासाठी शिक्षक सहकार संघटनेने वारंवार राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे. परंतु आजपर्यंत शासनाने या मागणीचा गांभिर्याने विचार केलेला नाही व मयत असलेल्या बांधवांच्या वारसांना कोणताही लाभ दिलेला नाही. यासाठी राज्यातील सर्व विभांगातील 60 संघटनांच्या एकञीकरणातून “जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती” स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून 22 नोव्हेंबर 2021 पासून मुंबई येथील आझाद मैदान येथून पेंशन संघर्ष याञेला सुरवात होणार आहे. महाराष्ट्रभर जुनी पेंशन संघर्ष याञा काढण्यात येणार आहे. या जुनी पेंशन संघर्ष याञेत राज्यातील सर्व विभागातील बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक सहकार संघटनेचे पुणे विभागीय प्रमुख दिपक परचंडे यांनी केले आहे. या संघर्षयाञेत शिक्षक सहकार संघटना महा. राज्य सहभागी होत आहे व सक्रीय पाठिंबा देत आहे, यासाठी संघटनेने मा. मुख्यमंञी, मा. मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव साहेब, ग्रामविकास विभाग महा. राज्य मंञालय मुंबई यांना मेलद्वारे निवेदन पाठवले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसद्गुरु साखर कारखान्याचा ॲडव्हान्स हप्ता रु. 2200 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, शेतकरी वर्गात आनंदीआनंद
Next articleपुणे जिल्हा बँकेसाठी भाजपमधुन श्रीमंत ढोलेना उमेदवारी मिळणार का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here