मुंबई येथे नामदेव महिला परिषदेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

मुंबई (बारामती झटका)

मुंबई येथे नामदेव महिला परिषदेची सर्वसाधारण सभा रविवार दि. २९ मे २०२२ रोजी यशस्वीरित्या पार पडली. या सभेला मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, तळा, म्हसळा, अलिबाग, कोल्हापूर, इचलकरंजी, पनवेल येथील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. सदर सभेला सकाळी ठीक ११.३० वा. सुरुवात झाली. यावेळी प्रथम अध्यक्षा आशालता वेल्हाळ यांनी उपस्थित महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अल्पोपहारानंतर सभेला सुरुवात झाली.

नामदेव महिला परिषदेच्या अध्यक्षा सौ. आशालता वेल्हाळ यांनी प्रास्ताविक म्हणून महिला परिषदेची माहिती, कार्य, सभेचे आयोजन याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर उपस्थित विश्वस्त, पदाधिकारी, अनेक ठिकाणचे अध्यक्ष यांना स्टेजवर येण्याची व स्थानापन्न होण्याची विनंती केली. त्यानंतर सचिव उर्मिला भुतकर यांनी सर्वांना श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचे प्रतिमेस हार, पूजन व दीपप्रज्वलन करण्याचे आवाहन केले. विश्वस्त उषाताई पोरे पुणे, हेमाताई खांडके, शैला पाडळकर, अध्यक्षा आशालता वेल्हाळ, उषाताई मुळे, इचलकरंजीच्या माजी अध्यक्ष सरोज उरणकर सर्वांनी दीपप्रज्वलन केले.

प्रथम कार्यकारी मंडळाला शुभेच्छा व नवीन अध्यक्षांचे स्वागत केल्यानंतर अभिनंदन करून नामदेव महिला परिषदेच्या कार्याची माहिती दिली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना, वादळ, टोळधाड, भूकंप, अतिवृष्टी या नैसर्गिक, मानवनिर्मित संकटांना तोंड देत समाजबांधवांनी मोठे कार्य केले. माणुसकी हा धर्म पाडला. स्वतःच्या जीवावर उदार होऊन मदत, कर्तव्य, आपुलकीच्या भावनेने जे कार्य केले त्याचा गौरव करण्यात आला. त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित केले. याच काळात ना. स. प. चे माजी अध्यक्ष सुधीर पिसे, नामदेव महिला परिषदेच्या मुख्य विश्वस्त डॉ. शीलाताई माळवे, माजी अध्यक्षा शोभाताई कराडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मुख्य कार्यक्रमाची सुरुवात “गणेश वंदनाने” तृप्ती गंद्रे यांनी केली. नामदेवांचा अभंगवाणी अर्चना गुजर व प्रभावती गुजर ठाणे यांच्या गायनाने झाली. स्टेजवरील सर्व विश्वस्त, पदाधिकारी, मान्यवरांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर निमंत्रित पाहुणे आणि गेल्या दोन वर्षापूर्वी आलेल्या नैसर्गिक संकटांना म्हणजे मुख्य कोरोना, अतिवृष्टी, भूकंप, भूस्खलन यावर मात करून ज्या समाजबांधवांनी जीवाची परवा न करता पुढाकार घेऊन मोठे कार्य केले. समाजाला माणुसकी, ममता, प्रेम या भावनेने तत्परतेने सेवा दिली. त्यांच्या कार्याचा गौरव व पोचपावती म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून नामदेव महिला परिषद कौतुक म्हणून सत्कार करीत आहे. त्यामध्ये प्रथम श्री. व सौ. जयश्री रवींद्र कालेकर, ॲड. श्री. व सौ. शितल प्रशांत बगाडे सर, श्री. व सौ. रोहिणी जयवंत औंधकर, डॉ. श्री. व सौ. हनुमंत शिंगण येऊ शकले नाहीत. दीपक सातपुते, राजेंद्र पाखरे डोंबिवली, राजेंद्र बारटक्के चुनाभट्टी, राजेंद्र उरणकर, राजेंद्र पिसे, गणेश हिरवे, रवींद्र मिरजकर, नगरसेविका प्रज्ञा भुतकर, येऊ शकले नाहीत. पण त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या सर्वांना शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षा आशालता वेल्हाळ यांनी सन्मानित केले. सर्व महिलांनी टाळ्यांच्या गडगडाटात प्रतिसाद दिला. समस्त शिंपी समाज या संस्थेतर्फे आशालता वेल्हाळ, रुपाली पोरे यांचा ‘उंच तुमचा झोका’ हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दीपक सातपुते व राजू पाखरे राजेंद्र पाखरे यांना त्यांचे श्रेय जाते.

त्यानंतर सर्व उपस्थित महिलांची ओळख नाव, गाव, छंद, कार्याची आवड याबद्दल वैयक्तिक स्तरावर माहिती देण्यात आली. जेणेकरून त्यांच्यातील सुप्त गुणांचा वाव देणे, महिलांना सक्षम, सबळ करण्याचा प्रयत्न करणे हा हेतू होता. सभेच्या पहिल्या सत्रात सुरुवात करताना सचिवांनी मागील सभेचा वृत्तांत व इतिवृत्त वाचून मंजुरी घेतली. इचलकरंजी येथे झालेल्या अधिवेशनाचा जमाखर्च माजी अध्यक्षा सरोज उरणकर यांनी सादर केला. त्याला सभेने मंजुरी दिली. आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये देण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती बाबत शिष्यवृत्ती सचिव रत्ना उत्तरकर यांनी माहिती दिली. नंतर मुंबई येथे होणाऱ्या अधिवेशनाबद्दल सर्वसंमत चर्चा अपेक्षा, सूचना, विचार विनिमय करून सर्व विश्वस्त, अध्यक्ष, पदाधिकारी यांनी सहभाग घेऊन चर्चा केली. जुनी पावतीपुस्तके वापरून नंतर नवीन पावतीपुस्तके छापण्याचे ठरले. त्यानंतर कार्यक्रमात व सभेच्या पहिल्या सत्राचा शेवट होण्याआधी उपस्थित महिलांच्या यादीतून दहा बक्षिसे खालील महिलांना देण्यात आली. शैला पाडळकर, शोभा वायचळ, प्रमोदिनी मेकडे, हेमलता खांडके, मीनल कुडाळकर, योजना शेळके, रूपाली पोरे, नीलिमा सुहास पिसे, मीनल ढवळे, तृप्ती गंद्रे घाटकोपर संगीत विशारद म्हणून गौरव करण्यात आला.

सभेच्या दुसऱ्या सत्रात विश्वस्तांनी देणग्या निधी, चेंज रिपोर्ट याविषयी चर्चा केली. सर्वांनी सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय नसल्याने श्रीमती उषा मुळे यांचा आभार प्रदर्शनानंतर सभा समाप्त झाल्याचे घोषित करण्यात आले. ही सर्वसाधारण सभा यशस्वी पार पाडण्यासाठी आमच्या चेंबूर घाटकोपरच्या वंदना माळवे, जयश्री कारंजकर, रूपाली झणकर, रेश्मा वंडकर, रूपाली पोरे, लतिका नाझरे, मनीषा शिंत्रे यांनी खूप परिश्रम केले. याबद्दल नामदेव महिला परिषद त्यांची आभारी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबदलापूर येथे प्रेरणा फाऊंडेशन अंतर्गत व इंटेग्रेवोन मॅनेज्ड सोल्युशन तर्फे प्रेरणा एज्युकेशन इन्स्टिट्यूट कॉम्प्युटर प्रशिक्षण लघु केंद्र उद्दघाटन संपन्न
Next articleपनवेल येथील सभेत पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here