सोलापूर जिल्हा संघटक शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
अकलूज ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या अकलूज शहराध्यक्षपदी महेश रामचंद्र पवार यांच्या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. तानाजीराव सावंत यांच्या सहकार्याने शिवसेना जिल्हा संघटक शिवाजीराव सावंत यांनी दिले. यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष मंगेश चिवटे, सोलापूर शहर प्रमुख मनोजभाई शेजवाल, माळशिरस तालुका अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत नेते व कार्यकर्त्यांची पक्षप्रवेशाची झुंबड उडालेली आहे. अकलूज शहराध्यक्षपदी महेश रामचंद्र पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सन्मान राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. तानाजीराव सावंत यांनी केलेला आहे. त्यांनी बारामती झटका वेब पोर्टल व युट्युब चॅनेलशी संपर्क साधल्यानंतर सांगितले कि, अकलूज पंचक्रोशीत शिवसेना शिंदे गटाचे काम इमानदारीने करून पक्ष वाढविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून पूर्ण वेळ पक्षासाठी काम करणार आहे. शिवसेनेच्या बुथ व वार्डनिहाय शाखा काढणार असुन माळशिरस तालुक्यात तालुका अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून गाव तिथे शाखा काढून माळशिरस तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे जाळे निर्माण करण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले. लवकरच माळशिरस तालुक्याची बैठक अकलूज येथे आयोजित करून भविष्यातील रणनीती ठरविणार असल्याचे सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
