मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचे माळशिरसचे अनिल भिवा ठेंगल यांनी आभार मानले.

ज्येष्ठ नेते सुरेश आबा वाघमोडे, जिल्हा उपप्रमुख संतोष आबा वाघमोडे, वैद्यकीय तालुका समन्वयक बापूराव क्षिरसागर, डॉ. मयुरी काळे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, रामराव सबूत, राजाभाऊ भिलारी यांचे माळशिरस शहरातील अनिल भिवा ठेंगल यांनी विशेष आभार मानले असून माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक ज्येष्ठनेते सुरेश आबा वाघमोडे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख व माजी नगरसेवक संतोष आबा वाघमोडे, माळशिरस तालुका वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष बापूराव क्षिरसागर यांच्या बद्दलही ठेंगल परिवार यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.

अनिल भिवा ठेंगल माळशिरस शहरामध्ये राहत आहेत. ते सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील आहेत. त्यांचा प्रतिकूल परिस्थितीत उदरनिर्वाह सुरू आहे. अनिल ठेंगल यांची कन्या कु. साक्षी वय वर्ष 16 हिच्या हृदयाला छिद्र असल्याने ऑपरेशन करण्याची गरज असल्याचे डॉ. मयुरी काळे यांनी सांगितल्यानंतर ठेंगल परिवार यांच्या पायाखालची जमीन सरकलेली होती. कारण उदरनिर्वाह करणे अडचणीचे असताना ऑपरेशनचा एवढा मोठा खर्च करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ठेंगल परिवार चिंतेत होता. अनिल ठेंगल यांचे मित्र सुनील गोरे यांना सर्व हाकिकत सांगितल्यानंतर त्यांनी वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका अध्यक्ष बापूराव क्षिरसागर यांच्याशी संपर्क साधला. बापूराव क्षिरसागर यांनी मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी व वैद्यकीय कक्षाचे सर्वेसर्वा मंगेशजी चिवटे यांच्याशी संपर्क साधून साक्षीचे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन करण्यात आलेले आहे.

साक्षीचे यशस्वी ऑपरेशन झाल्यानंतर ठेंगल परिवाराच्या आनंदाला पारावर उरलेला नाही‌. माळशिरसचे ज्येष्ठ नेते सुरेश आबा वाघमोडे, उपजिल्हाप्रमुख संतोष आबा वाघमोडे, मदत कक्षाचे अध्यक्ष बापूराव क्षिरसागर यांनी साक्षीच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन यशस्वी ऑपरेशन झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

ठेंगल परिवार यांनी आभाराचे पत्र उपस्थित मान्यवरांना देऊन कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमदनसिंह मोहिते पाटील यांची मोरोची येथील स्व. बकुळाबाई सुळ पाटील यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट.
Next articleश्रीराम कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांकडून फळबागवर पडणाऱ्या रोगांवर प्रतिबंधक उपाय, योजनाविषयी पाटिलवस्ती येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here