करमाळा (बारामती झटका)
संवेदनशील मुख्यमंत्री ज्या पद्धतीने राज्यातील सर्वसामान्य जनतेची सेवा करत आहेत त्याच पद्धतीने फिसरे गावातील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचा माझा मनोदय असून विशेषता आरोग्याच्या संदर्भात सर्वसामान्यांना मदत करण्याची भूमिका घेणार असल्याची माहिती फिसरे गावचे नूतन सरपंच हनुमंत रोकडे यांनी दिली. सरपंचपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने हनुमंत रोकडे यांचा सत्कार जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण, हिवरवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, प्राध्यापक अशोक नरसाळे, देवीचा माळ शाखाप्रमुख अशोक चव्हाण, शिवसेना हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या सत्कारानंतर बोलताना महेश चिवटे म्हणाले की, हनुमंत रोकडे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत, आरोग्य शिबिराचे आयोजन करावे, शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी फिसरे गावाला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
यावेळी हनुमंत रोकडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानून त्या काळात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास करू असे सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng