मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक संवेदनशील व्यक्तिमत्व असून आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात त्यांच्या मनात असलेली सद्भावना व सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची भूमिका ही अनुकरणीय आहे. खऱ्या अर्थाने ते सर्वसामान्यांची आरोग्याची सेवा घेत आहेत, काळजी घेत आहेत, असे मत जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी यांनी व्यक्त केले.
बेंगलोर येथील आश्रमात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य संदर्भातील कार्याचा अहवाल दिला व त्यांनी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली.
हे सर्व प्रगती अहवाल पाहून श्री श्री रविशंकरजी यांनी समाधान व्यक्त करून आरोग्य सेवा ही महत्वाची सेवा असून येणाऱ्या काळात रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी सुदर्शन क्रिया असेल, शारीरिक व्यायामाचे प्रकार असतील व मनाला शांतता देणारे, साधना असेल तरच मनुष्य सदृढ राहू शकतो.

सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर दुर्धर आजाराचे संकट आले व त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असेल तर ते कुटुंब चिंताग्रस्त होते. किंबहुना वैफल्यग्रस्त होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांना मिळत असलेली मदत ही लाख मोलाची आहे. शिवाय एकनाथजी शिंदे यांनी ठाणे येथे स्वतःच्या आईच्या नावाने सुरू केलेले कॅशलेस हॉस्पिटल हे सर्वसामान्यांसाठी आधार ठरत आहे.
यावेळी मंगेश चिवटे यांनी आध्यात्मिक श्री श्री रविशंकर यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng