मुळशीतील शेरे गावातील महिलांचा नवीन उपक्रम – स्वातताई कदम

मुळशी (बारामती झटका)

राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून हळदी कुंकू कार्यक्रम शेरे गावात आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाला संस्थेच्या ट्रस्टी पुनमताई मेहता, तसेच प्राचीताई व्यास सुंदरम, सौ. प्रतिभाताई व्यास या उपस्थित होत्या.

यावेळी पुनमताईनी महिलांसाठी असलेला कायद्यांची माहिती दिली. महिलांनी ह्या कायद्यांचा कसा उपयोग करून घ्यावा व कुठल्याही कागदावर सही करताना काय काळजी घ्यावी, याविषयी खुप छान माहिती दिली.

सदर कार्यक्रमाचे आयोजन सौ. चित्राताई ढमाले (CRP) यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. तसेच यावेळी लोक कल्याण व्यसनमुक्ती केंद्रांच्या संचालिका सुजाता प्रताप ओहळे, राष्ट्रीय मानव अधिकार संपर्कप्रमुक महाराष्ट्र राज्य सुवर्णाताई माने यांनी organic सॅनिटरी पॅड ची माहिती दिली. राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या महिला संघटिका
स्वातीताई कदम यांनी कार्यक्रमाचे संयोजन, रूपरेषा, सुत्रसंचालन केले. तसेच ग्रामपंचायत शेरेचे सरपंच संतोषजी ढमाले यांच्या सुविद्य पत्नी सौ. मनिषाताई संतोष ढमाले, स्नेहा गांधी तसेच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअकलूजमध्ये ४ फेब्रुवारीला मूकनायक ते प्रबुध्द भारतचा जागर!
Next articleधर्मपुरी येथील ग्रामसेविका साळवे यांची बदली रद्द करण्याबाबतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here