शासकीय दुखवटा न पाळता नियमांचे उल्लंघन केले व ग्रामपंचायतचा मालकी हक्क नसताना नोटिसा दिल्या.
माळशिरस ( बारामती झटका )
मेडद ता. माळशिरस ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी दि. 07/02/2022 रोजीचा शासकीय दुखवटा न पाळता नियमाला डावलुन ग्रामपंचायतीचा मालकी हक्क नसताना अतिक्रमण काढणे बाबत नोटीस दिलेले आहेत. त्यासंबंधित त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणेबाबत माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे. त्यावेळी माणिक सोनटक्के, दादासाहेब ढेरे, कुंडलिक पाटील, सुशांत झंजे, संतोष गांधी, सोमा गोरे, नंदू शेख, अनिल झंजे, सुलतान शेख, सर्जेराव सोनटक्के, बाळू सोनटक्के, साहेबराव सिद, माऊली सोनटक्के, साहेबराव लवटे, धनाजी लवटे, जगन्नाथ पवार, महादेव हांगे, नारायण पांढरे, रहीम शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या नोटिशीमध्ये रविवार दि. 06/02/2022 व सोमवार दि. 07/02/2022 रोजी शासकीय दुखवटा जाहीर सुट्टी असूनही ग्रामपंचायतीचा मालकी हक्क नसतानासुद्धा इतर जागेत ग्रामसेवक यांनी नियमाला डावलुन अतिक्रमण काढणे बाबत नोटीस प्रसारित केलेल्या आहेत. सदरची बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. त्यांनी शासकीय नियमास आधीन न राहता आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय नियमाला केराची टोपली दाखवली आहे. तरी त्यांचे वरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ जाहीरपणे उपोषण करण्यास भाग पडू, असे तक्रारी अर्ज नमूद करून सदर तक्रारी अर्जाच्या प्रती उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर, माळशिरस पंचायत समिती सभापती व उपसभापती यांना दिलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng