माळशिरस ( बारामती झटका )
मेडद तालुका माळशिरस ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच नाथाआबा लवटे पाटील यांचा सन्मान गौतमआबा मित्र परिवाराच्या वतीने माळशिरस मधील यशोदा निवास येथील गौतमआबा माने यांच्या संपर्क कार्यालयात सन्मान करण्यात आला.

नूतन सरपंच नाथाआबा लवटे पाटील यांचा फेटा बांधून शाल खांद्यावर टाकून हार गळ्यामध्ये घालून, हातात श्रीफळ देऊन माळशिरस पंचायत समितीचे विद्यमान सदस्य गौतमआबा माने व महानमल्ल पैलवान आप्पासाहेब टेळे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी वस्ताद सर्जेराव घोडके, युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, ह-भ-प बापूसाहेब टेळे महाराज, किंगमेकर तात्यासाहेब वाघमोडे, पैलवान बिट्टू नरूटे, गोरडवाडी ग्रामपंचायतचे सदस्य पांडुरंग पिसे, पैलवान सचिन माने, बाळासो साळुंखे, शंकरराव मिसाळ, शाहरुख मुलानी, फोटोग्राफर शशिकांत म्हमाणे, संपादक श्रीनिवास कदम पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng