मेडदच्या ग्रामसेवकाचे डोके फिरले आहे का ? शासकीय दुखवट्यात धूमधडाक्यात कामकाज सुरू.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाला आवरावे, त्रस्त जनतेची मागणी..

माळशिरस ( बारामती झटका )

मेडद ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत हद्दीतील केलेले अतिक्रमण काढणे बाबतच्या नोटिसा संबंधितांना दि. 07/02/2021 रोजी देण्याचे धूमधडाक्यात सुरू आहे. सध्या भारताची गानकोकिळा भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांचे दुःखद निधन झाल्याने दोन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केलेला आहे. आज शासकीय दुखवट्याचा दुसरा दिवस आहे. अशा दुःखाच्या प्रसंगी झोपलेला ग्रामसेवक जागे झाला आहे आणि त्यांनी लोकांना नोटिसा देण्याचे काम सुरू केले आहे. माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी डोके फिरलेल्या ग्रामसेवकाला आवर घालणार का, असा संतप्त नागरिकांमधून सवाल उपस्थित होत आहे.

ग्रामपंचायत मेडद येथील मासिक सभा दि. 24/01/2022 ठराव क्रमांक 8 मध्ये विषय ग्रामपंचायत हद्दीतील केलेले अतिक्रमण काढणे बाबत असा ठराव करून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 53 प्रमाणे अतिक्रमण काढणे बाबत नोटीस देण्याचे काम सुरू आहे. सदरच्या नोटीसवर सरपंच, ग्रामपंचायत निवडणूक यांची स्वाक्षरी आहे. सदरची प्रत गटविकास अधिकारी पंचायत समिती, माळशिरस यांचेकडे माहितीसाठी सविनय सादर असे नोटिशी वर नमूद करून सदरच्या नोटिसा अतिक्रमण धारक यांना देण्याचे काम सुरू आहे.

ग्रामपंचायत यांनी अतिक्रमण काढणे हा ग्रामपंचायतीचा भाग झाला. मात्र, संपूर्ण देश, राज्य दुःखाच्या सावटामध्ये असल्याने शासकीय दुखवटा जाहीर असताना ग्रामसेवक यांनी संबंधितांना नोटिसा देऊन शासकीय काम इमानेइतबारे करीत असल्याचे पुतना मावशीप्रमाणे प्रेम उफाळून आलेले आहे. त्यामुळे माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संपूर्ण कारभार बंद असताना ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक यांच्यावर काय प्रशासकीय कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अनेक ग्रामस्थ आंदोलन व उपोषण करण्याच्या पवित्र्यात आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसुप्रियाताई सुळे यांचा महाराष्ट्रातील युवतींनी आदर्श घ्यावा – बी. टी. शिवशरण
Next articleकृषि विभागाच्या सहकार्याने छोटे उद्योजक होण्याची सुवर्णसंधी !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here