मेडद गावचे जगताप आणि मांडवे गावचे मोरे यांचा मराठमोळा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न.

चि. सौ. कां. शितल जगताप आणि चि. नितीन मोरे या वधूवरांचे सुवर्णरथात भव्य शामियानाकडे आगमन.

जयसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, गणपतराव वाघमोडे, बाळासाहेब कर्णवर पाटील, मारुतीराव पाटील, बाळासाहेब लवटे पाटील, सोपानकाका नारनवर, लक्ष्मणराव पवार, महाराष्ट्र केसरी बंकटराव पवार आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह उद्योजकांची विशेष उपस्थिती.

माळशिरस ( बारामती झटका )

मेडद ता. माळशिरस येथील स्वर्गीय श्रीरंग धोंडीबा जगताप यांची नात व श्री‌. हनुमंतराव श्रीरंग जगताप यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. शितल आणि मांडवे ता. माळशिरस येथील स्वर्गीय दामोदर बाळा मोरे यांचे नातू व श्री. महादेव दामोदर मोरे यांचे द्वितीय चिरंजीव नितीन यांचा आज रविवार दि. 20/2/2022 रोजी दुपारी 12:40 या शुभमुहूर्तावर सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात अक्षदांच्या वर्षावात आणि वडीलधारी मंडळींच्या शुभ आशीर्वादाने शाही विवाह सोहळा अक्षता मंगल कार्यालय अकलूज रोड 61 फाटा या ठिकाणी मराठमोळ्या पद्धतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.


चि. सौ. कां. शितल जगताप आणि चिरंजीव नितीन मोरे या नववधूंचे सुवर्ण रथात स्टेजवर उभारण्यात आलेल्या भव्य शामियानाकडे पारंपारिक पद्धतीने महिलांनी आकर्षक वाद्याच्या निनादात सनई चौघड्याच्या सुरामध्ये ठेका धरून नववधूंना लग्नसमारंभाच्या व्यासपीठावर उभारण्यात आलेल्या भव्य शामियानाकडे वाजत गाजत आणण्यात आले होते.
लग्न समारंभाचे प्रेषक प्रमोटर्स अँड बिल्डर्स धनकवडी पुणे मेडद गावचे उद्योजक दादासाहेब श्रीरंग जगताप आणि पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक धनकवडी येथे वास्तव्यास असणारे मेडद गावचे सुपुत्र नानासाहेब पांडुरंग जगताप यांच्यासह जगताप परिवार आणि मांडवे गावचे मोरे परिवार या दोन्हीही परिवाराने उपस्थित सर्व आलेल्या आप्तेष्ट नातेवाईक यांचे स्वागत व सन्मान केला.


मराठमोळा पद्धतीने शाही विवाह सोहळा थाटामाटात व उत्साही वातावरणात संपन्न झाला.
शुभ विवाह सोहळ्यास सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी भेट देऊन वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.


सदर शुभविवाहास प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी उपसभापती व माळशिरसचे ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, डॉ. मोरे नातेपुते, श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब लवटे पाटील, जयवंततात्या पालवे, माळशिरस नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक लक्ष्मणराव पवार, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन अशोकराव सपकळ, महाराष्ट्र केसरी बंकटराव पवार लातूर, ऑल इंडिया कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष वस्ताद विजयराव बराटे, धनकवडीचे सुप्रसिद्ध उद्योजक संजय धनकवडे, गुरुकृपा पतसंस्था चेअरमन संतोष जगताप, सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन तुकाराम सोलनकर, श्री छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक बाबुराव यादव, चीफ इंजिनियर प्रकाशराव तुपे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर ह.भ.प शिवाजीराव तुपे, युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, उद्योगपती पुणे प्रमोद तुपे, सुनील झंजे, माजी कार्यकारी संचालक माणिकराव जगताप, मेडदचे विद्यमान सरपंच नाथाआबा लवटे पाटील, माजी सरपंच युवराज झंजे, भगवान झंजे, उंबरे दहिगावचे सरपंच विष्णुपंत नारनवर, इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार सपकळ, युवानेते महेशराव सपकळ, मेडदचे उपसरपंच शिवाजीराव लवटे, ग्रामपंचायत सदस्य अनिल लवटे, युवा नेते पैलवान भोजराजतात्या माने, दत्ताभाऊ झंजे, भास्कर उर्फ मामा तुपे, विजय तुपे आदी मान्यवरांसह विशेष करून पुणे परिसरातील उद्योजक, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडॉ. आर. एन. इंगवले पाटील पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली – आ. शहाजीबापू पाटील
Next articleमाळशिरसमध्ये शिवजयंतीनिमित्त चिमुकलीची लक्षवेधी वेशभूषा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here