श्री काळ भैरवनाथ शेतकरी विकास पॅनल व श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनल आमनेसामने, आज मतदान व सायंकाळी निकाल होणार…
मेडद ( बारामती झटका )
मेडद ता. माळशिरस या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची दोन पॅनलमध्ये निवडणूक लागलेली आहे. दोन्ही पॅनलकडून प्रचार करून विजयाचा दावा केला जात आहे. सोसायटीच्या निवडणुकीनंतर मेडद गावचे राजकारण खर्या अर्थाने वेगळ्या वळणावर येणार आहे.
मेडद ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत व सरपंच निवडीच्यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लवटे पाटील व विद्यमान सरपंच नाथाआबा लवटे पाटील या काका-पुतण्याचे नवीन राजकारण सुरू झालेले होते. त्यावेळेस अनेक दिवस एकत्रित राजकारण केलेले असल्याने बाळासाहेब लवटे पाटील यांच्या विचाराच्या लोकांनीसुद्धा नाथाआबा लवटे पाटील यांना मतदान केलेले होते. कारण नाथा आबाच्या गुलालातील लोकं पैलवान वैभव लवटे पाटील यांच्या वाढदिवसाला सहभागी झालेले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सोसायटीच्या या निवडणुकीत तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सोसायटीच्या निवडणुकीनंतर मेडद गावचे राजकारण नवीन वळणावर येणार आहे.
मेडद गावावर पाच ते सहा गावांचे राजकारण अवलंबून असते. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मेडद गावच्या निर्णयावर निकाल ठरलेला असतो. एक वर्षापासून नवीन राजकारणाला सुरुवात झाली असल्याने सोसायटीचा निकाल राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे.
श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनल व श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये 13 जागांसाठी 26 उमेदवार उभे राहिलेले आहेत.
श्री काळभैरवनाथ पॅनलचे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव तुपे, ज्येष्ठ नेते दादासाहेब जगताप, शंकरराव काळे, विजयराव तुपे, विद्यमान उपसरपंच शिवाजी लवटे, दत्ताभाऊ झंजे, सदस्य अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात सोपान महादेव हंगे, अमर लालासो जगताप, आनंता गोविंद काळे, विष्णू विठ्ठल पवार, भास्कर लक्ष्मण तुपे, विठ्ठल कुंडलिक यादव, अनिल भानुदास झंजे, सूर्यकांत निवृत्ती झंजे असे आठ उमेदवार आहे. महिला प्रतिनिधी गटात रेखा राजाराम तुपे, संगीता अनिल झंजे, अनुसूचित जाती जमाती गटात शिवाजी लक्ष्मण भिसे, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटात सचिन सोपान लवटे, इतर मागास प्रवर्ग गटात आप्पा तुकाराम सोनटक्के असे 13 उमेदवार उभे आहेत.
श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनलचे विद्यमान सरपंच नाथाआबा लवटे पाटील, माजी सरपंच युवराज झंजे, वस्ताद प्रताप झंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात अंबादास महादेव चव्हाण, मनोहर अण्णा जगताप, चंद्रकांत केरु काळे, शिवाजी नामदेव लवटे पाटील, विजय वसंत पाटील, गणपत प्रभू झंजे, राजाराम भीमा झंजे, युवराज भीमा झंजे असे आठ सदस्य आहेत. महिला प्रतिनिधी गटात उज्वला नाथासो पाटील, सुशीला बबन झंजे, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात किसन निवृत्ती लवटे, अनुसूचित जाती जमाती गटात श्रीमंत दगडू सरतापे, इतर मागास प्रवर्ग गटात संभाजी बाबा यादव असे तेरा सदस्य उभे आहे.
मेडद विविध कार्यकारी सेवा संस्थेची स्थापना 1949 साली झालेली आहे. संस्थेचे 422 सभासद आहेत. त्यापैकी मतदानाला 313 सभासद पात्र आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयाची आहे. संस्था नेहमी 100% वसुली करत असते. संस्थेचा डिव्हीडंट वाटप केला जातो. श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचे कपबशी चिन्ह आहे. श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनलचे शिट्टी हे चिन्ह आहे. सध्या बाळासाहेब लवटे पाटील गट, तुपे व जगताप गट एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालानंतर मेडद गावच्या राजकारणाची खरी दिशा ठरणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng