मेडद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नाथाआबा लवटे पाटील विजयी.


मेडद ( बारामती झटका )

मेडद ता. माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूक नाथाआबा लवटे पाटील यांनी सौ. लता विजय तुपे यांचा एक मतांनी पराभव करून विजयी झालेले आहे.


मेडद ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच युवराज झंजे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदी नाथाआबा लवटे पाटील विजयी झालेले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोमवार दि. 17 जानेवारी 2022 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा माळशिरस मंडल अधिकारी एस. के. खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची सरपंच निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सरपंच पदासाठी नाथाआबा लवटे पाटील व सौ. लता विजयराव तुपे यांनी अर्ज दाखल केले होते.

अर्जाची छाननी होऊन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला दोन वाजता सुरुवात झाली गुप्त मतदान घेण्यात आले त्यामध्ये नाथआबा लवटे पाटील यांना सात मते तर सौ लता विजयराव तुपे यांना सहा मते पडली निवडणूक निर्णय अधिकारी एस के खंडागळे यांनी नाथाआबा लवटे पाटील यांच्या सरपंच पदासाठी विजय असल्याची घोषणा केली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरता फोंडशिरस सर्कलचे एस. टी. चव्हाण ग्रामसेवक आर्.एम. चव्हाण तलाठी ए .पी. खेडकर यांनी सहकार्य केले ग्रामपंचायत निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्याकरता माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपकरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळकर साहेबयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यांना सहकार्य पोलीस नाईक रुपनवर व पोलीस कॉन्स्टेबल बोराटे यांच्यासह पोलिस प्रशासनातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.


नाथाआबा लवटे पाटील यांची सरपंच पदाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी गुलालाची उधळण हलग्यांचा कडकडाट करून जल्लोष केला. नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यालयाच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांच्या समवेत विजयाचा आनंद लुटला वाजत गाजत ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये नूतन सरपंच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांनी गर्दी केलेली होती. निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी माजी सरपंच युवराज झंजे व पोपटराव लवटे पाटील सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून होते कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार न घडता सरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे ॲड. सुमित सावंत यांची प्रचारात आघाडी…
Next articleज्येष्ठनेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या निधनाने शेतकरी व कष्टकऱ्यांची चळवळ पोरकी झाली – माजी खासदार राजू शेट्टी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here