मेडद ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत नाथाआबा लवटे पाटील व नवनाथ जगताप यांच्यात चुरशीची लढत.

श्रीमती सीताबाई रामचंद्र तोरणे वय 106 वर्ष यांनी मतदानाचा हक्क बजावला 83. 59 टक्के मतदान झाले आहे.

बाळासाहेब लवटे पाटील (काका ) यांच्या प्रतिष्ठेची तर नाथाआबा लवटे पाटील (पुतण्या ) यांच्या अस्तित्वाची निवडणूक.


मेडद ( बारामती झटका )

मेडद तालुका माळशिरस येथे ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत नातावरा लवटे पाटील व नवनाथ जगताप यांच्यात चुरशीची लढत झालेली आहे संपूर्ण वार्डाचे मतदान 878 होते त्यापैकी 734 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावले ला आहे 83 पॉईंट 59 टक्के मतदान झाले आहे. श्रीमती सीताबाई रामचंद्र तोरणे वय 106 यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे.


मेडद गावांमध्ये मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी असे दोन गट आहेत मोहिते-पाटील गटाचे पांडुरंग जगताप प्रतिनिधित्व करीत होते सध्या त्यांचे पुत्र दादासाहेब जगताप पार्टीचे प्रमुख आहेत तर विरोधी पार्टीचे बाळासाहेब लवटे पाटील हे पार्टी प्रमुख आहेत. पोटनिवडणुकीत जगताप गटासोबत पहिल्यांदाच बाळासाहेब लवटे पाटील यांनी पोट निवडणुकीत हातमिळवणी केलेली आहे विशेष म्हणजे मोहिते-पाटील गटाकडून नवनाथ जगताप तर विरोधी गटाकडून बाळासाहेब लवटे पाटील यांचे सख्खे पुतणे नाथाआबा लवटे पाटील उभे आहे. काका जरी उभा नसतील तरी त्यांनी पुतण्या पुढे आव्हान उभे केलेले आहे. त्यामुळे काका-पुतण्याची लढत असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. बाळासाहेब लवटे पाटील यांच्या प्रतिष्ठेची तर नाथाआबा लवटे पाटील यांच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे.


बाळासाहेब लवटे पाटील यांनी नवनाथ जगताप यांचा प्रचार करून मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंट म्हणून मतदान केंद्रात उपस्थित होते. जगताप गटाचे सर्व नेते व कार्यकर्ते यांच्या सोबत पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, विद्यमान उपसरपंच शिवाजी लवटे, माजी सरपंच सचिन उर्फ धुळा लवटे ग्रामपंचायत सदस्य अनिल लवटे, या सर्वांनी नवनाथ जगताप यांचा प्रचार केलेला आहे तर सरपंच युवराजतात्या झंजे, त्रिमूर्ती केसरी वस्ताद प्रतापराव झंजे, महान मल्ल पोपटराव लवटे पाटील यांच्यासह विरोधी गटातील कार्यकर्ते यांनी नाथाआबा यांचा प्रचार केलेला आहे. मेडद ग्रामपंचायतच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी निवडणूक मतदारांनी पाहिलेली आहे त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार आहे त्यावेळेस काकाची प्रतिष्ठा आणि पुतण्याचे अस्तित्व सिद्ध होणार आहे पोटनिवडणुकीच्या निकालावर मेडद गावची राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleBroker plus500 Bonus Promotion
Next articleराष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे व प्रदेश सचिव श्रीराम सातपुते यांची बारामती झटका कार्यालयास सदिच्छा भेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here