मेडद ग्रामपंचायत सरपंच पदाची सोमवारी निवड होणार ? निवडणूक होणार की बिनविरोध ?

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नाथाआबा लवटे पाटील सरपंच पदाचे प्रबळ दावेदार.


माळशिरस ( बारामती झटका )

मेडद तालुका माळशिरस या ग्रामपंचायतीचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच युवराज झंजे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवड सोमवार दिनांक 17 /2/20 22 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची मीटिंग आयोजित केलेली आहे ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सदस्य नाथाआबा लवटे पाटील सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार आहेत.
मेडद ग्रामपंचायत मध्ये शिवाजी अनंता लवटे, शिलाबाई मारुती झंजे, वैशाली संतोष हांगे, वसंत दत्तात्रय जगताप, कोमल चंद्रकांत तोरणे, संगीता अनिल झंजे, अनिल उत्तम लवटे, बाजीराव हनुमंत काळे, लता विजय तुपे, सुलोचना शिवाजी पाटील, लक्ष्मी हनुमंत काळे, दादासो विठ्ठल सरतापे, नाथाआबा भानुदास लवटे , असे तेरा ग्रामपंचायत सदस्य आहेत.
माजी सरपंच युवराज झंजे, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदाचे दावेदार नाथाआबा लवटे यांनी सोबत सात ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह देवदर्शन टूरवर आहेत उद्या निवड असल्याने सरपंच पदाची निवडणूक लागणार का ? बिनविरोध होणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
मेडद ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 ते 12 नामनिर्देशन पत्राची छाननी 12 ते 1 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दुपारी 1 ते 2 सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुकीची वेळ दुपारी 2 वाजता असल्याचे ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाळुंग – श्रीपुर नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकणार – मौलाभाई पठाण
Next articleलोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी मायाक्का देवी मंदिर व होलार समाजाचा प्रश्न मिटवला – नारायण मारुती फारसे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here