माढा लोकसभेचे कर्तव्यदक्ष खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या भ्रमणध्वनीवर बाळासाहेब लवटे पाटील यांची चर्चा.
माळशिरस ( बारामती झटका )
मेडद तालुका माळशिरस गावचे ज्येष्ठ नेते माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील यांच्या मेडद येथील मातोश्री निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांची चाय पे चर्चा झाली यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रांतिक सदस्य सोलापूर जिल्हा प्रभारी के के पाटील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, निमगाव चे युवा नेते मिनीनाथ मगर, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, ज्येष्ठ नेते माणिकराव सोनटक्के, पैलवान वैभव लवटे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वी तालुक्यातील महत्त्वाच्या गावामध्ये गाव भेट दौरा सुरू केलेला आहे मेडद गावामध्ये गेल्यानंतर के. के .पाटील यांचे पंचायत समितीमधील जुने सहकारी बाळासाहेब लवटे पाटील यांच्या मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चहा पाण्याचा आस्वाद घेतला . आणि चाय पे राजकीय चर्चा रंगली.

माढा लोकसभेचे विकासप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा भ्रमणध्वनी बाळासाहेब सरगर यांना आलेला होता त्यावेळेस त्यांनी मेडद येथे बाळासाहेब लवटे पाटील यांच्या निवासस्थानी असल्याचे सांगताच फोन बाळूभाऊ यांच्याकडे देण्यास सांगितला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि बाळू भाऊ यांची फोनवर दहा मिनिटे चर्चा सुरू होती असे बाळू भाऊ यांचे विश्वासू सहकारी माणिकराव सोनटक्के यांनी सांगत असताना कमळासारखा चेहरा फुललेला होता त्यामुळे खासदार नेमके बाळासाहेब लवटे पाटील यांना फोनवर काय बोलले याचा कोणालाच थांगपत्ता नाही मात्र बाळूभाऊ च्या चेहऱ्यावर बोलत असताना हावभाव मात्र समाधान कारक होते. फोन बंद झाल्यानंतर उपस्थितांना केके पाटील यांनी सांगितले बाळू भाऊ यांनी लोकसभेच्या वेळी चांगले काम केले होते याची आठवण कायम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माळशिरसचा विषय निघाल्यानंतर मेडदचा आवर्जून उल्लेख करीत असतात असे सांगितले अनेक राजकीय विषयावर चर्चा करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त बारामती झटकाच्या हाती लागलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng