पैलवान माऊली कोकाटे व पैलवान महेंद्र गायकवाड यांची एक लाख रुपये इनामाची कुस्ती.
माळशिरस ( बारामती झटका )
मेडद तालुका माळशिरस येथील ग्रामदैवत काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान गुरुवार दि. 17/02/ 2022 रोजी दुपारी तीन वाजता सुरु होणार आहे.
पैलवान माऊली कोकाटे हनुमान आखाडा पुणे वस्ताद गणेश दांगट यांचा पठ्ठा आणि पैलवान महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा यांच्यामध्ये एक नंबरची कुस्ती इनाम रुपये एक लाख रुपये या इनामावर होणार आहे. पैलवान सतपाल सोनटक्के आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा व पैलवान सुरज मुलाणी वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. पैलवान संग्राम साळुंखे स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा व पैलवान विजय मांडवे वस्ताद स्वर्गीय दत्ताआप्पा वाघमारे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. पैलवान तुषार झंजे वस्ताद महादेव ठवरे यांचा पठ्ठा व पैलवान आकाश ढेरे वस्ताद स्वर्गीय दत्ताआप्पा वाघमारे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे. पैलवान शुभम माने अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पठ्ठा व पैलवान अभि ननवरे वस्ताद स्वर्गीय दत्ताआप्पा वाघमारे यांचा पठ्ठा यांच्यात लढत होणार आहे.

रुपये इनाम 51 ते 5000/- हजाराच्या आतील कुस्त्या सकाळी 10 ते 12 या वेळेत ठरवल्या जातील व त्या कुस्त्या मैदानात लावल्या जातील याची सर्व पैलवानांनी व वस्ताद यांनी नोंद घ्यावी असे काळभैरवनाथ यात्रा महोत्सव मेडद व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने कळविण्यात येत आहे. सदर कुस्ती मैदानाचे समालोचन पैलवान हनुमंत शेंडगे करणार आहेत तरी सर्व कुस्तीप्रेमी व कुस्ती शौकीन यांनी लाभ घ्यावा..
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng