मेडद ( बारामती झटका )
मेडद ता. माळशिरस येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान उद्योगपती दत्ताभाऊ झंजे व मेडद गावचे माजी उपसरपंच गोविंद झंजे यांच्या वतीने करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी मेडद गावची कु. सीमा विष्णू झंजे, कुमार युवराज जगताप, कचरेवाडी गावची कु. रेशमा बाळासाहेब सरगर यांनी एमपीएससी परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सन्मान उद्योगपती दत्ताभाऊ झंजे व मेडद गावचे माजी उपसरपंच गोविंद झंजे यांच्यावतीने करण्यात आला.

यावेळी उद्योगपती दादासाहेब जगताप, माजी सरपंच भगवान झंजे, माजी सदस्य सर्जेराव झंजे, सूर्यकांत झंजे, नवनाथ झंजे, दादा सरगर, बाळासाहेब झंजे, बापूराव सरगर, झंजे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
माळशिरस तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. समाजातील मुला-मुलींनी यांचा आदर्श घेऊन आपले ध्येय व उद्दिष्ट पूर्ण करावे शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी सत्काराचे आयोजन केलेले असल्याचे दत्ताभाऊ झंजे यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng