मेडद विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत 13 जागांसाठी 26 उमेदवार आमने सामने.

श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनल व श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनल यांच्यामध्ये समोरासमोर लढत.

मेडद ( बारामती झटका )

मेडद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मेडद, ता. माळशिरस या सेवा संस्थेची सन 2021 – 22 ते 2026 -27 या सालाकरिता पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली आहे. श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनल व श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये 13 जागांसाठी 26 उमेदवार उभे राहिलेले आहेत.
श्री काळभैरवनाथ पॅनलचे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव तुपे, ज्येष्ठ नेते दादासाहेब जगताप, शंकरराव काळे, विजयराव तुपे, विद्यमान उपसरपंच शिवाजी लवटे, सदस्य अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातसोपान महादेव हंगे, अमर लालासो जगताप, आनंता गोविंद काळे, विष्णू विठ्ठल पवार, भास्कर लक्ष्मण तुपे, विठ्ठल कुंडलिक यादव, अनिल भानुदास झंजे, सूर्यकांत निवृत्ती झंजे असे आठ उमेदवार आहे. महिला प्रतिनिधी गटात रेखा राजाराम तुपे, संगीता अनिल झंजे, अनुसूचित जाती जमाती गटात शिवाजी लक्ष्मण भिसे, भटक्या जमाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग गटार सचिन सोपान लवटे इतर मागास प्रवर्ग गटात आप्पा तुकाराम सोनटक्के असे 13 उमेदवार उभे आहे.

श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनल विद्यमान सरपंच नाथाआबा लवटे पाटील, माजी सरपंच युवराज झंजे, वस्ताद प्रताप झंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात अंबादास महादेव चव्हाण, मनोहर अण्णा जगताप, चंद्रकांत केरु काळे, शिवाजी नामदेव लव्हटे पाटील, विजय वसंत पाटील, गणपत प्रभू झंजे, राजाराम भीमा झंजे, युवराज भीमा झंजे असे आठ सदस्य आहेत. महिला प्रतिनिधी गटात उज्वला नाथासो पाटील, सुशीला बबन झंजे भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात किसन निवृत्ती लवटे अनुसूचित जाती जमाती गटात श्रीमंत दगडू सरतापे, इतर मागास प्रवर्ग गटात संभाजी बाबा यादव असे तेरा सदस्य उभे आहे.

मेडद विविध कार्यकारी सेवा संस्थेची स्थापना 1949 साली झालेली आहे. संस्थेचे 422 सभासद आहेत. त्यापैकी मतदानाला 313 सभासद पात्र आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयाची आहे. संस्था नेहमी 100% वसुली करत असते. संस्थेचा डिव्हीडंट वाटप केला जातो. संस्थेची दुसऱ्यांदा निवडणूक लागलेली आहे. स्थापनेपासून सत्ताधारी गटाने एक हाती संस्थेवर वर्चस्व ठेवलेले आहे. श्रीनाथ परिवर्तन पॅनल यांनी पुन्हा आव्हान उभे केलेले आहे. श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचे कपबशी चिन्ह आहे. श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनलचे शिट्टी हे चिन्ह आहे. त्यामुळे परिवर्तन करणाऱ्या पॅनलची या निवडणुकीत तरी शिट्टी वाजेल का ? असा प्रश्न मेडद पंचक्रोशीत उभा राहिलेला आहे. कारण बाळासाहेब लवटे पाटील गटाची गेल्या वेळेस एक हाती सत्ता आलेली होती. सध्या यांच्या गटात तुपे व जगताप गट एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकांद्याला मिळाला केवळ एक रुपया किलो दर !!!
Next articleकण्हेर सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी प्रा. शिवाजीराव माने तर, व्हाईस चेअरमनपदी तात्यासो चव्हाण यांची निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here