मेडीक्वीन मेडिको पेजेंट मिसेस महाराष्ट्र 2022 स्पर्धेचा तिसरा सीजन संपन्न

मुंबई (बारामती झटका)

वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी मेडीक्विन मेडिको पेजंट तर्फे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रेरणा बेरी – कालेकर आणि सचिव डॉ. प्राजक्ता शहा यांच्या तर्फे सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, डेंटल, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अशा सर्व डॉक्टरांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी या स्पर्धेचे हे तिसरे पर्व होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे 200 महिला डॉक्‍टरांनी सहभाग नोंदवला असून त्यातून 55 स्पर्धक शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले.

अंतिम फेरीमध्ये 5 विजेते रॉयल कॅटेगरी मधून वय वर्ष 23 ते 48 आणि 3 विजेते क्लासिक कॅटेगिरी मधून वय वर्ष 48 च्या पुढे असे घोषित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्राताई पवार यांनी या स्पर्धेस पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेते व मॉडेल समीर धर्माधिकारी, रांका ज्वेलर्सचे शीतल रांका, सहारा इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. श्रद्धा जवंजाळ, गतवर्षीच्या सीजन 2 च्या माजी विजेत्या डॉ. उज्वला बद्रापुरकर व डॉ. रेवती राणे यांनी मिळून या विजेत्यांची निवड केली. या स्पर्धेसाठी अकलूजमधून सहा महिला स्पर्धकांनी अंतिम फेरी गाठली. यामध्ये डॉ. शिल्पा फडे, डॉ. अदिती थिटे, डॉ. वैष्णवी शेटे, डॉ. प्राजक्ता देवकाते, डॉ. अर्चना गवळी, डॉ. दीपश्री एकतपुरे यांनी अंतिम फेरी गाठली. तर या स्पर्धेत डॉ. राधिका विश्वेश्वर नवी मुंबई विजेत्या तर अकलूजच्या डॉ. शिल्पा फडे या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

यावेळी परीक्षक म्हणून बोलताना डॉ. श्रद्धा जवंजाळ म्हणाल्या की, मेडीक्विन ही एक अत्यंत आगळीवेगळी कल्पना असून यामध्ये फक्त महिलांचे सौंदर्य न पाहता त्यांचे समाजाप्रती असलेले कार्य, कलागुण आदी गोष्टी लक्षात घेऊन ही स्पर्धा घेतली जाते. स्पर्धेत सहभागी झालेले सर्व सदस्य यातील विजेतेच असतात. सौंदर्य हे व्यक्तीचे लक्ष वेधून घेते. पण सुंदर व्यक्तिमत्व हे मन जिंकते. त्याप्रमाणे इथे सर्वच ब्युटी विथ ब्रेन आहेत, असे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. या स्पर्धेसाठी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून अभिनेत्री पूजा सावंत, सुशांत शेलार, तेजपाल वाघ, उत्कर्ष शिंदे बिग बॉस फेम व दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते उपस्थित होते. तर या कार्यक्रमास अभिनेते स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मकरंद अनासपुरे, पुष्कर जोग यांनी व्हिडिओ बाईट देऊन शुभेच्छा दिल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी नातेपुते येथील मुस्लिम बांधवांच्या शाही मज्जीद येथील अंधाराची अडचण दूर केली.
Next articleमाळशिरस येथील विलास मारुती देशमुख यांचे दुःखद निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here