मे.जिल्हा न्यायाधीश यांनी कलम 376 मधील आरोपी नाना महादेव वाघ व नागेश नाना वाघ यांचा जामीन फेटाळला.

फिर्यादीचे वकील ॲड. राहुल लवटे पाटील यांचा युक्तिवाद मेहेरबान जिल्हा न्यायाधीश -१ मं.ना.पाटिल यांनी ग्राह्य धरून जामीन फेटाळला.

माळशिरस ( बारामती झटका )

बागेवाडी ता. माळशिरस येथील 19 वर्षीय पीडित मुलीने अकलूज पोलीस स्टेशन येथे दि. 09/12/2021 रोजी फूस लावून पळवून नेऊन धमकी देऊन लग्न करून जबरदस्तीने शारीरिक संबंध करणाऱ्या अभिजीत नाना वाघ रा. बागेवाडी व त्यांना मदत करणारे नाना महादेव वाघ, नागेश नाना वाघ व रोहित शिंदे रा. बागेवाडी आणि वैभव विजय गायकवाड रा. गिरझणी यांच्या विरोधात अकलूज पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. त्यातील आरोपी क्रमांक 2 व 3 नाना महादेव वाघ व नागेश नाना वाघ रा. बागेवाडी यांचा जामीन मे जिल्हा न्यायाधीश मं.ना. पाटील यांनी फिर्यादीचे वकील ॲड. राहुल लवटे पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींचा जामीन फेटाळला.माळशिरस येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश सो यांच्या न्यायालयात मूळ फिर्यादी यांचे वकील ॲड. राहुल लवटे पाटील यांनी आरोपी नाना महादेव वाघ व नागेश नाना वाघ यांचे विरुद्ध एफ आय आर 852/2021 प्रमाणे अकलूज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर भा.द.वि. कलम 376. 366. 506 सह 34 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा तपास अद्याप चालू आहे. आरोपी व मूळ फिर्यादी हे एकाच गावातील असून एकमेकांचे शेजारी आहेत. आरोपी व मूळ फिर्यादी यांचे घरांमध्ये फक्त 100 मीटर अंतर आहे. त्यामुळे आरोपी हे साक्षीदार यावर तसेच फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबावर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एवढेच नव्हे तर आरोपी हे यातील फिर्यादी व फिर्यादीच्या कुटुंबावर हल्ला करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवाद मांडलेला होता. मेहरबान न्यायाधीश यांनी ग्राह्य धरून आरोपींचा जामीन फेटाळला आहे. ॲड. राहुल लवटे पाटील यांना ॲड. एस. एस. पिसाळ व ॲड. एस. एस. पांढरे पाटील यांनी सहकार्य केले‌.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचि. सौ. का. वृषाली काळे आणि चिरंजीव निलेश गलंडे यांचा शाही शुभविवाह सोहळा उत्साहात संपन्न.
Next articleदेशमुख परिवारांच्या “स्वप्नपूर्ती” या वास्तूच्या वास्तुशांती, गृहप्रवेश व सत्यनारायण पूजा समारंभाचे आयोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here