माळीनगर(बारामती झटका)
माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशालेत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रशालेमध्ये आज सोमवारी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
सोमवार दि.४ ऑक्टोंबर २०२१ रोजी शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीची शाळा सुरू करण्यात आली. संस्थेचे व्हा.चेअरमन अजय गिरमे, प्राचार्य गिरीश ढोक,उपप्राचार्य प्रकाश चवरे,पर्यवेक्षिका स्वाती घोडके,पालक श्री.शेंडगे,श्री.चव्हाण,श्री.साबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके,गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर राजीव देवकर,रितेश पांढरे,बी एम भोसले,सुनील जवरे,नामदेव जोशी,सौ.वैशाली पांढरे,सौ.सविता पांढरे,सौ.रजनी चौरे,सौ.उमा महामुनी,आदी उपस्थित होते.

सकाळी शाळा भरण्यापूर्वी गेटवर विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करून व सॅनिटायझर मारून त्यांना प्रवेश देण्यात आला.या प्रसंगी ठीक पावणे अकरा वाजता प्रशालेचे शिपाई कर्मचारी राहुल टिळेकर यांनी शाळेची पहिली घंटा वाजवली.अनेक महिन्यांनी शाळेच्या घंटेचा आवाज कानावर पडू लागल्याने विद्यार्थी,पालक,संस्थाचालक,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात प्रसन्नता दिसून आली.

विद्यार्थ्यांना प्रशाले विषयी आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून प्रशालेच्या हायस्कुल चौकातील वर्गाचा परिसर झेंडूच्या फुलांनी व रांगोळी काढून तिथे सजावट करण्यात आली होती.प्रशाला भरल्यानंतर ज्युनिअर विभागाचे प्रा.सुनील शिंदे यांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली.यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विद्यार्थ्यांना योग्य आंतर घेऊन हायस्कुल चौकात उभे करून कोरोना व आरोग्याच्या दृष्टिकोनातून सूचना देण्यात आल्या.तसेच शिक्षक संजय बांदल यांनी यावेळी विद्यार्थ्यांसाठी कोव्हीड नियमावली प्रतिज्ञेचे वाचन केले.

प्रशालेतील विद्यार्थिनी कु.सानिका रानमाळ व स्नेहा तडवळकर यांनी प्रशाला चालू झाल्याबद्दल त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच जवाहर नवोदय विद्यालयासाठी चि.संस्कार जीवन बागवले व चि. प्रसाद निलेश बुगड यांची निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय बांदल यांनी केले तर जगन्नाथ कोळी यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng