75 लाख रूपये कामाचे उद्घाटन
माळशिरस (बारामती झटका)
मोटेवाडी च्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार राम सातपुते यांनी मोटेवाडी (मा) येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.राज्यात विरोधकांची सत्ता असून देखील एक रुपयाचाही निधी दिला नाही विरोधकांकडून निवडणूकीत फक्त जातीचे राजकारण केलं जात असा आरोप आमदार राम सातपुते यांनी लगवला. यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पंचायत समितीचे उपसभापती प्रताप पाटील जि प सदस्या सौ संगीता मोटे जि प सदस्य राहूल वाघमोडे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर ओबीसीची मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष मामासाहेब पांढरे माजी जि प सदस्य लक्ष्मण पवार संघटन सरचिटणीस संजय देशमुख संजय मोटे गणपतराव वाघमोडे तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण माने युवराज देशमुख भैय्या निंबाळकर बांधकाम विभागाचे डेपूटी इंजिनिअर रणवरे सरपंच द्वारका खरात उपसरपंच कलावंती ठेंगल आदी उपस्थित होते.

यावेळी मोटेवस्ती रुपनवर रस्ता डांबरीकरण करणे, गणपत खरात वस्ती ते हरि दडस वस्ती खडीकरण रस्ता करणे ,श्रीनाथ मंदिर सभा मंडप बांधणे ,भक्त निवास खोली बांधणे श्रीनाथ मंदिर, श्रीनाथ मंदिर पेविंग ब्लॉक बसवणे ,जि प शाळा दुरुस्ती व पेविंग ब्लॉक बसवणे, जि प शाळा गावठाण व पालवे वस्ती ऑल कंपाउंडर करणे आरोग्य केंद्र मारुती मंदिर रस्ता करणे, जि प शाळा व्यवस्थित दुरुस्ती व पेविंग ब्लॉक बसवणे ,जि प शाळा माने वस्ती दुरुस्ती करणे, अहिल्यादेवी पुतळा हायमास्ट दिवा बसवणे ,यमगर वस्ती हायमास्ट दिवा बसवणे, नागोबा मंदिर म्हसवड रोड ते हायमास्ट दिवा बसवणे, श्रीनाथ मंदिर ते सीद वस्ती रस्ता करणे आधी 75 लाख रुपये कामाचे उद्घाटन आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात जयवंत मोटे रघुनाथ खरात दादा मोटे महादेव मोटे गणपत हांडे महादेव माने दत्ता वायदंडे अर्जुन यमगर रावसाहेब खरात बापू माने माऊली हांडे शहाजी मोटे आदीनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng