मोरोची (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन कृषि विभाग मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यक्षेत्रातील २६ गावात डाळिंब पीन होल बोरर, मका लष्करी अळी नियंत्रण, हुमणी अळी नियंत्रण, हवामान आधारित फळपीक विमा, बीजप्रक्रिया व खरीप पीक विमा योजना अंतर्गत प्रचार प्रसिद्धी व प्रसारची संयुक्त मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेअंतर्गत मौजे मोरोची येथील ५२ शेतकरी बांधवांनी प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेटीसाठी सहभाग नोंदविला.
सदर कार्यक्रमात श्री. अमित गोरे यांना मका लष्करी अळी नियंत्रण, श्री दत्तात्रय पांढरमिसे यांनी हुमणी अळी नियंत्रण श्री, सतीश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते यांनी एकरी १०० टन ऊस उत्पादन सुत्रे व बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, श्री रणजीत नाळे यांनी डाळींब पीन होल बोरर व श्री. सचीन देठे आर सी एफ यांनी मका व बाजरी बीजप्रक्रिया या वर प्रात्यक्षिक मार्गदर्शन व माहिती दिली. तसेच कार्यक्रमात श्री. दत्तात्रय गायकवाड तालुका कृषि अधिकारी माळशिरस यांनी गट शेती, पंतप्रधान सुक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योगाबाबत महिती दिली.
कार्यक्रमांनतर मोरोची गावात लावलेल्या ३० हुमणी नियंत्रण लाईट ट्रॉपला भेटी देऊन निरीक्षणे घेतली. यामध्ये सापडलेल्या तीन हजार पेक्षा जास्त हुमणी प्रौढ किटक बघून शेतकऱ्यांना विश्वास पटला व महत्व विशद करून दाखविण्यात आले. या कार्यक्रमास मोरोची गावचे प्रथम नागरिक श्री. समाधान गोरे, सरपंच श्री. बाळासाहेब माने, उपसरपंच श्री. भिमराव साळूंखे, सोसायटी चेअरमन श्री. अनिल सुळ, मा. सरपंच सुनिल सुळ, वैभव वावरे ग्रा. सदस्य, श्री. लक्ष्मण सुळ, श्री. दातात्रय सुळ, श्री. विठ्ठल सोनमळे, श्री. चंद्रकांत भोसले हे प्रगतशिल शेतकरी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे नेटके नियोजन व सुत्रसंचालन श्री. विजयकुमार कर्णे व आभार प्रदर्शन श्री. उदय साळूंखे यांनी करून चहापानाने कार्यक्रमांची सांगता झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng