मोरोची विकास सेवा सोसायटीवर मोहिते पाटील गटाचे तेरा सदस्य यांची बिनविरोध निवड.

मोहिते पाटील समर्थक शिवामृत दूध संघाचे संचालक संस्थेचे विद्यमान भीमराव साळुंखे यांची एकहाती सत्ता.

मोरोची ( बारामती झटका )

मोरोची ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सन 2021- 22 2026-27 पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे नेते जयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संस्थेचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवामृत दूध संस्थेचे संचालक व विकास सेवा संस्थेचे विद्यमान चेअरमन भीमराव साळुंखे गटाची बिनविरोध एक हाती सत्ता स्थापन झालेली आहे.
मोरोची विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर मोहिते पाटील समर्थक शिवामृत दूध संघाचे संचालक भीमराव साळुंखे गेल्या तीस वर्षापासून या संस्थेवर चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल दीड कोटीच्या आसपास आहे. सदरची संस्था दरवर्षी 100% वसूल असून नफ्यात असते सभासदांना दर वर्षी लाभांश वाटला जातो. संस्थेला स्वतःची भव्य इमारत आहे सदर संस्थेचा पारदर्शकपणे कारभार चालू आहे संस्थेचे सचिव मदनराज पाटील हे कामकाज पाहत आहेत. सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही. कोरे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले त्यांना सहकार्य संस्थेचे सचिव मदनराज पाटील यांनी केले.

सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटात साळुंखे भिमराव गेना, माने बाळासो हरिबा, साळुंखे विजय शिवाजी ,कणसे विलास रामा, कर्चे गोरख साधू, पानसकर रामचंद्र बबन, कुमकले दिलीप महादेव, साळूंखे सुधीर भिमराव असे आठ सदस्य आहेत. महिला प्रतिनिधी गटात पवार शोभा दिलीप, कुमकले कांचन तानाजी अशा दोन महिला सदस्य आहेत.
इतर मागास वर्ग गटात जाधव बाळासाहेब विठ्ठल भटक्या विमुक्त जाती जमाती गटात माने राजाराम बाबू अनुसूचित जाती जमाती गटात झेंडे यशवंत मच्छिंद्र असे सर्व मिळून तेरा सदस्य बिनविरोध झालेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Next articleखरेदीखताचा मार्ग मोकळा, तुकडाबंदीचे नियम रद्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here