मोरोची विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (गेट-टुगेदर) मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न…

वीस वर्षांनी एकत्र आलेले मित्र-मैत्रिणी, शिक्षक प्रशाला समितीचे आजी-माजी पदाधिकारी यांनी दिला अनेक जुन्या आठवणींना उजाळा.

मोरोची (बारामती झटका)

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित मोरोची विद्यालय मोरोची सध्या मोरजाई विद्यालय नावाने सुप्रसिद्ध असलेल्या विद्यालयाच्या 2001-02 या वर्षातील दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा वीस वर्षांनी (गेट-टुगेदर) स्नेह मेळावा आजी-माजी शिक्षक प्रशाला समितीचे पदाधिकारी यांच्या समवेत जुन्या आठवणींना उजाळा देऊन स्नेह मेळावा मोठ्या थाटात व उत्साहात कार्यक्रम संपन्न झालेला आहे. स्नेह मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडे मॅडम होत्या.

या कार्यक्रमाची सुरुवात मोरोची गावचे ग्रामदैवत मोरजाई देवी आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा चोपडे मॅडम, स्थानिक प्रशाला समितीचे भीमराव गेना साळुंके, हनुमंत देवबा सुळ, मनोहर पिराजी सुळ, यशवंत मच्छिंद्र झेंडे, सुनील आप्पा माने, मुख्याध्यापक विकास उत्तम सूर्यवंशी, माजी मुख्याध्यापक मोहन सखाराम सूळ यांच्यासह प्रशालेचे आजी-माजी शिक्षक व त्या सालातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.उपस्थित सर्व आजी-माजी शिक्षक व विद्यार्थी यांना स्थानिक प्रशाला समितीचे हनुमंत देवबा सुळ यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.

अनेक आजी-माजी शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्या मनोगतामध्ये अनेक आणि वेगवेगळे अनुभव सांगितले. उत्साहपूर्ण वातावरणात पाच तास हा कार्यक्रम सुरू होता. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी शाळेला त्याची आठवण म्हणून साऊंड सिस्टिम भेट दिली. यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह भेट दिले असल्याने कार्यक्रमाची आठवण कायम राहणार आहे. सदर कार्यक्रमास स्थानिक प्रशाला समितीचे भीमराव गेना साळुंखे, हनुमंत देवबा सुळ, मनोहर पिराजी सुळ, यशवंत मच्छिंद्र झेंडे, सुनील आप्पा माने, मुख्याध्यापक विकास उत्तम सूर्यवंशी, माजी मुख्याध्यापक मोहन सखाराम सूळ, चोपडे मॅडम, आजी-माजी शिक्षकांमध्ये शिवाजी सोपान कर्चे, मोहन संपत गोरे, चंद्रकांत भिवा कवटे, दादासाहेब यशवंत खरात, ज्ञानोबा गोविंद साळुंखे, सुरेश आनंदा साळुंखे, दिलीप महादेव नलवडे, मोहन तुकाराम बनसोडे, बाळासाहेब वसंत बळवंतराव, राजेंद्र यमाजी गायकवाड, नानासाहेब राणे सर, आचार सर, सौ. आशा महामुनी मॅडम, सौ. आशा मोरे मॅडम, सौ. सविता शिवाजी गायकवाड,मोरोची विद्यालयाचे 2001-02 साली दहावीमध्ये असणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी गृहिणी, शेती, उद्योग, व्यवसाय, नोकरी व व्यापार अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपले नाव कमवलेले आहे. सुधीर भिमराव साळुंके कृषी केंद्र, सर्जेराव सुरेश सुळ फॅब्रिकेशन वेल्डर, श्रीमंत रोहिदास पानस्कर नगरशेठ, संदीप नागेश शिंदे रोडलाईन्स व्यवसाय, तुषार ठोंबरे कंपनीत सर्विस, आनंदा किसन रुपनवर मेडिसिन कंपनी, मदनसिंह निवृत्ती रुपनवर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी, शैलेश सुभाष वाडेकर भारत फोर्स नोकरी, पंकज नलवडे डॉक्टर, सुशांत जयंत कांबळे रेल्वेमध्ये नोकरी, सचिन माधव कर्चे प्राथमिक शिक्षक, विजय ज्ञानदेव खिलारे महाराष्ट्र पोलीस, दादा शिवाजी गोरे शेती, भीमराव अशोक पवार शेती, अशोक मोहन झेंडे शेती, दत्तात्रेय निगडे खडी क्रेशर व्यवसाय, हनुमंत माने व्यवसायिक, दादा देवकाते जेसीबी व्यवसाय, समाधान झेंडे उद्योजक, प्रदीप रामचंद्र सूळ शेती, भीमराव महावीर सुळ कारखान्यामध्ये चीटबॉय, प्रमोद शशिकांत झेंडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय, सचिन देवकर पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, आनंदा भिसे पेंटर, अजित किसन सुळ शेती, स्मिता चंद्रकांत भोसले कम्प्युटर व्यवसाय, उर्वरित सर्व विद्यार्थिनी गृहिणी आहेत. मंगल सूळ, ताई जगन्नाथ काळे, रुक्मिणी रणदिवे, रूपाली देवकाते, ललिता यादव, स्मिता माने, रेखा साळुंके, रेशमा मोहन सुळ, मंदाकिनी पोपट सुळ, मनीषा ज्ञानदेव माने, कीर्ती प्रकाश खंडागळे, स्वाती लक्ष्मण सुळ, रेशमा रोहिदास पानसकर, अर्चना बाबुराव सुळके, रूपाली मोहन कुमकले, लतिका धनंजय वावरे, शुभांगी मुगुटराव कदम, वर्षा तानाजी घनवट, वैशाली मारूती होळ, रेश्मा सुभाष भोसले आदी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी मनपसंत भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कर्चे सर व तुषार ठोंबरे यांनी केले. तसेच आभार राणे सर यांनी मानले.आजी-माजी शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना वीस वर्षानंतर एकत्र आणण्यासाठी सर्जेराव सुरेश सुळ, सुधीर भिमराव साळुंखे, श्रीमंत रोहिदास पानसकर, सचिन आनंदा देवकर, प्रदीप रामचंद्र सूळ यांनी विशेष परिश्रम घेऊन सर्वांना एकत्र आणून कार्यक्रम केल्याबद्दल प्रशाला समितीचे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी पाच पांडवांचे विशेष आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleदेशमुख परिवारांच्या “स्वप्नपूर्ती” या वास्तूच्या वास्तुशांती, गृहप्रवेश व सत्यनारायण पूजा समारंभाचे आयोजन.
Next articleअर्धनारीनटेश्वर महाविद्यालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय – संग्रामसिंह मोहिते पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here