एखाद्या चित्रपटात बीस साल के बाद तसंच वीस वर्षाने विद्यार्थी व शिक्षक यांचा आपुलकीचा स्नेहमेळावा.
मोरोची ( बारामती झटका )
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांचे मोरोची विद्यालयाच्या माजी विद्यार्थी-शिक्षकांच्या प्रीती भोजनासह स्नेहसंमेलनाचे आयोजन रविवार दि. 26/12/2021 रोजी सकाळी दहा वाजले पासून दुपारी चार वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. एखाद्या चित्रपटात 20 साल के बाद तसंच वीस वर्षांनी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांचा आपुलकीचा स्नेह मेळावा संपन्न होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात मोरोची विद्यालय, मोरोची आहे. या विद्यालयाचे सन 2001-02 या वर्षाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांसमवेत (गेट-टुगेदर) स्नेह मेळावा संपन्न होत आहे. सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. स्वागत, प्रस्तावना, दिपप्रज्वलन करून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचा सन्मान, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सन्मान, मनोगते, फोटोसेशन, स्नेहभोजन, उर्वरित विद्यार्थ्यांचा सन्मान, मनोगते आणि शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा शेवट होणार आहे.
शाळा म्हटले की, ज्ञान, अभिमान, दोस्ती, मौजमस्ती, आठवणी, आपुलकी, अशा गोष्टी शालेय जीवनात घडत असतात. विद्यालयातील शिक्षण संपल्यानंतर नंतर निरोप हा असतोच आणि आठवणीला उजाळा देण्याकरता पुन्हा एकदा गेट-टुगेदर स्नेहा मेळावा असतो. वीस वर्षांनी विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र येत आहेत. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. अनेकांमध्ये आमूलाग्र बदल झालेले असणार आहेत. अनेकजण उद्योग व्यवसाय, नोकरी, शेती यामध्ये गुंतलेले असतात. क्वचितच समारंभामध्ये थोड्या फार लोकांच्या भेटी होत असतात. अनेकजण कितीतरी वर्षे एकमेकांना भेटलेली नसतात. वीस वर्षानंतर विद्यार्थी व शिक्षक यांचा आपुलकीचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असल्याने आठवणीचा सोनियाचा दिन उगवला असे होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng