मोरोची सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी भीमराव (आप्पा) साळुंखे तर व्हाईस चेअरमनपदी राजाराम बाबु माने यांची निवड.

मोहिते पाटील समर्थक शिवामृत दूध संघाचे संचालक भीमराव साळुंखे सलग सहाव्यांदा चेअरमन पदी विराजमान.

मोरोची ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे नेते जयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संस्थेचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोरोची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मोरोची या सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला.

अकलूज सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बिनविरोध चेअरमन, व्हॉइस चेअरमन पदाच्या निवडीसाठी गुरुवार दि. 22/05/2022 रोजी संचालक मंडळाची सभा पार पडली. यावेळी सोसायटीचे
चेअरमन पदासाठी भीमराव गेना साळुंखे, तर व्हा. चेअरमन पदासाठी राजाराम बाबु माने यांचे एकमेव अर्ज आलेले असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कोरे यांनी बिनविरोध निवड झालेली घोषणा केली.

यावेळी देवबा सुळ विकास सोसायटीचे चेअरमन जालिंदर सुळ, माजी उपसरपंच एकनाथ पानसकर, पोपट घनवट, दत्तात्रय साळुंके, गुंडीबा माळी, शिवाजी साळुंखे, परशुराम झेंडे, केशव पानसकर, आनंदा फुले, हनुमंत साळुंखे, मंदार साळुंखे, श्रीमंत पानसकर, अभिजीत माने सर्व सभासद व ग्रामस्थ नूतन संचालक, माने बाळासो हरिबा, साळुंखे विजय शिवाजी, कणसे विलास रामा, कर्चे गोरख साधू, पानसकर रामचंद्र बबन, कुमकले दिलीप महादेव, साळूंखे सुधीर भिमराव, पवार शोभा दिलीप, कुमकले कांचन तानाजी, जाधव बाळासाहेब विठ्ठल, झेंडे यशवंत मच्छिंद्र आदी उपस्थित होते. तसेच तज्ञ संचालक म्हणुन मनोहर पिराजी सुळ व तात्यासो चंद्रकांत सुळ यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी कोरे साहेब यांना विकास सेवा संस्थेचे सचिव मदनराज पाटील यांनी सहकार्य केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजनजागृती सेवा समितीच्या वतीने सिंधुरत्न फाऊंडेशन प्रस्तुत ‘विधीलेख’ या महिला दशावतार नाटकातील कलाकारांचा सन्मानपत्र देऊन गौरव
Next articleवेळापूर येथील चि.सौ.कां. पूजा उर्फ चिऊ शिंदे आणि चि. प्रवीण निकम यांचा शाही विवाह सोहळा संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here