माळशिरस ( बारामती झटका )
कचरेवाडी ता. माळशिरस येथील युवा उद्योजक मोहन शेठ विरकर यांचा 33 वा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रेणुका हॉटेल व स्वीटहोमचे मालक शिवाजीराजे सपकाळ यांनी पेढा भरवून वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देऊन उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो अशा पद्धतीने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस साकडे घातलेली आहे.
कचरेवाडी ता. माळशिरस येथील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब असणारे सौ. पार्वती व श्री. विष्णू विरकर या सुसंस्कृत दांपत्याच्या पोटी मोहनशेठ यांचा जन्म झालेला आहे. त्यांना सतीश हे एक बंधू आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर दोघा बंधूंनी राम लक्ष्मणाच्या जोडीसारखे असणारे बंधू यांनी जिद्दीच्या जोरावर अफाट कष्ट करून समाजातील तरुणांना प्रेरणा देणारा आदर्श निर्माण केलेला आहे. त्यांनी सुरुवातीस 2008 साली जमीन नांगरट व सपाटीकरण करण्याकरता पुढच्या फळीचा ट्रॅक्टर घेतलेला होता. सदरचा ट्रॅक्टर मराठवाडा भागांमध्ये जास्त शेताच्या सपाटीकरणाची कामे असतात. त्यामुळे मराठवाडा परिसरात उद्योग, व्यवसाय आणि कष्टातून त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायाला सुरुवात केलेली होती. त्यानंतर 2012 साली श्री गुरुदत्त इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली. त्यांचे बंधू सतीश यांनी माळशिरसमध्ये गुरुदत्त कलेक्शन नावाचे कापडाचे सुसज्ज असे दुकान सुरू केलेले आहे. सध्या मोहनशेठ विरकर यांच्याकडे टू टेन मशीन हायवा टिपर अशी वहाने असून त्यांचा कन्स्ट्रक्शन चा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आई-वडिलांच्या आशीर्वादाने व बंधूच्या साथीने आपला प्रपंच सुस्थितीत आणलेला आहे. त्यांच्याकडे अनेक कर्मचारी काम करीत आहेत. उद्योग व्यवसायामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मित्र परिवार व कामगारांनी वाढदिवसाचे नियोजन केलेले होते. मात्र सध्या कोरोना परिस्थिती असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने कोणाचाही हार, फेटा आणि गुच्छ न घेता केक सुद्धा न कापता साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. प्रतिकूल परिस्थितीवर स्वकर्तुत्वाने मात करणारा व समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण करणारा उमदा तरुण युवा उद्योजक मोहनशेठ विरकर यांना बारामती झटका परिवार यांचेकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng